Type Here to Get Search Results !

प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम आणि रब्बी हिमायतनगर येथे कंपनीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन





प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम आणि रब्बी
हिमायतनगर येथे कंपनीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन


हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे
हंगाम २०२२-२३ युनाइटेड इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनी मार्फत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचे द्वारा नांदेड जिल्ह्यात राबविल्या जात आहे, खरीप आणि रब्बी हंगाम २०२२-२३ हंगामासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय
शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास व त्या पिकाचा विमा उतरवून ते पिक शेतकऱ्यांनी संरक्षित कलेले असल्यास त्याची नुकसान भरपाई कंपनी कडून शासनाने निश्चित केलेल्या पिकाच्या जोखीम स्तरानुसार दिल्या जाते. पिक विमा भारताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, त्या करिता तालुका स्तरावर त्यांना मदत व सहकार्य मिळावे या हेतूने प्रत्येक तालुक्यात कंपनीचे कार्यालय सुरु करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यात लाकडोबा चौक या ठिकाणी युनाइटेड इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनी च्या कार्यालयाचे उदघाटन तालुका कृषी अधिकारी मा.श्री. बि.ए.शनेवाड साहेब ,यांच्या हस्ते रिब्बीन कापून करण्यात आले, या प्रसंगी तालुका मंडळ कृषी अधिकारी मा.श्री. गुणवंत टारपे साहेब , कृषी पर्यवेक्षक मा. श्री. मारोती काळे साहेब, कृषी सहाय्य्क श्री.निलेश वानखेडे साहेब, कृषी कार्यालयाचे लिपिक श्री. अमोल सुदेवाड साहेब, तालुक्यातील शेतकरी, गावातील मान्यवर मंडळी, उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरताना किंवा पिकाचे नुकसान झाल्या नंतर पिक नुकसानीची सूचना कंपनीला कळवण्या करिता व पीकविमा संबंधित कुठल्याही इतर मदती साठी या कार्यालयात संपर्क करावा या कार्यालयात कंपनीचे तालुका प्रतिनिधी श्री. सचिन घुले मो.नंबर ७८७५०६३६६० हे कार्यरत राहणार आहेत. त्याच बरोबर पिक नुकसानीची तक्रार ७२ तासाच्या आत करणे गरजेचे असल्या कारणाने शेतकऱ्यांनी भारत सरकारच्या क्रॉप इन्शुरन्स अँप , कंपनीचा टोल फ्री नंबर 1800 233 7414 तसेच कंपनी चा pmfbypune@ulic.co.in ई मेल या तीन माध्यमातून कळवावे. असे कंपनीचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad