ईस्लापुर , शिवनी , अप्पारावपेट , जलधरा परीसरात झालेल्या पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे.आता पंचनामे करून सर्व्ह करुन वेळ न घालवता तात्काळ अहवाल द्या अशी मागणी ईस्लापुर येथील शिवसेना कार्यकर्ते यांनी केली आहे.
गत पंधरा दिवस झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीला मुग नक्षत्राच्या दरम्यान वेळी अवेळी पाऊस झाल्याने सुरवातीच्या शेतकऱ्यांच्या अनेक मंडळात सुरवातीला शेतकऱ्यांच्या अनेक मंडळात दुबार पेरणीच्या संकटात जावे लागले आहेत.शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली आहे यासाठी त्यांना तातडीची मदतीची गरज आहे. असे ते म्हणाले ईस्लापुर , जलधरा , शिवनी परीसरात पावसाच्या पाणी पुराच्या पाण्याने प्रचंड नुकसान झाले आहे. सोबत पशु व जीवीत हानी झाली आहे त्यामुळे या नुकसान भरपाईसाठी आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन अशी मागणी ईस्लापुर येथील शिवसेनिकांनी केली आहे.यावेळी उपस्थित जेष्ठ शिवसेनिक माधव बैलवाड , विष्णू बैलवाड ( शाखा प्रमुख) प्रशांत डांगे ( ग्रा.प.सदस्य) साईनाथ बैलवाड , अवधूत सोळंके शिवसेनिक , शुभम पेशवे , सर्व शिवसैनिकांनी मागणी केली आहे.
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव