पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास दिली शासनाची आर्थिक मदत
किनवट प्रतिनिधी / गजानन वानोळे
पुरात वाहुन गेलेल्या परोटी येथील शेतकऱ्याच्या कुटुंबाचे सांत्वन करुन आ.भिमराव केराम यांच्या हस्ते चार लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले.
परोटी येथील शेतकरी जितेद्र किनरवाड यांचा दि.18 जुलै सोमवार रोजी परोटी ते रिठाकडे जाणाऱ्या मार्गावरिल पुलाच्या पाण्यात वाहुन जाऊन मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली .
या मयत शेतकऱ्यांच्या कुंटुबाचे आ.भिमराव केराम यांनी दि.27 रोजी प्रत्यक्ष भेटून मयत शेतकऱ्यांच्या पत्नीला चार लाख रुपयाचा धनादेश दिला.
गेल्या 20 दिवसा पासुन किनवट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने चारही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दि.27 रोजी आमदार भीमराव केराम यांनी कोसमेट, कुपटी, झळकवाडी ,भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची शेतकऱ्याच्या शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे शासनाकडे आदेश दिले आहे. असे आमदार भिमराव केराम यांनी सांगितले
किनवटच्या तहसिलदार डाँ मूणाल जाधव, यांनी इस्लापूर जलधरा ,शिवनी, अप्पाराव पेठ या चारही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याची स्पष्ट कबुली दिली. याची नोंद घेऊनच शासनाकडे अहवाल पाठवल्या जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी वेळी दिली. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती कपिल करेवाड, आदिवासी आढावा समितीचे मा.अध्यक्ष भगवान हूरदूके, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदिप केंद्रे, बाबुराव केद्रे,अनिल तिरमनवार, यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..