Type Here to Get Search Results !

शिवप्रभा व ग्रॅन्ड मराठाने स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाला दिली शिक्षणोत्सावाची अनोखी किनार!




•शिवप्रभा व ग्रॅन्ड मराठाने स्वातंत्र्य अमृतमहोत्सवाला दिली शिक्षणोत्सावाची अनोखी किनार!

•जि.प.आकोली शाळेच्या १३६ विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक किट प्रदान


•अध्ययनस्तर विकास कार्यक्रमाला चालना देण्याचा स्तुत्य प्रयत्न


प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर

दि.२२ सामाजिक मदतकार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व ग्रॅन्ड मराठा फांउडेशन मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या औचित्याने जि.प.उ.प्रा.आकोली शाळेच्या तब्बल १३६ विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक किटचे नुकतेच वाटप करण्यात आले.सदर वितरण कार्यक्रम शिवप्रभा संस्थापक अमोल साईनवार,ग्रैंड मराठा फाउंडेशन संस्थापक रोहित शेलटकर(इंग्लैंड) ,विश्वस्त सौ माधवी शेलटकर यांचे मार्गदर्शनात शिवप्रभा कोषाध्यक्ष परशुराम नरवाडे, जिल्हा प्रमुख सोहम नरवाडे व ग्रॅन्ड मराठा फांउडेशनचे ऋषभ गोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात बुधवारी उस्फूर्तपणे पार पडला.
         शिवप्रभा टिम शिक्षण,आरोग्य, पर्यावरण ,शेती व समाजातील गरजुंसाठी गेली कित्येक वर्षापासून सातत्याने निस्वार्थपणे काम करत आहे.हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करतांना टिमने ग्रॅन्ड मराठा फांउडेशनच्या संयुक्त विद्यमाने गरजु व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्याची योजना हाती घेतली होती. त्याअंतर्गत महाराष्ट्राच्या ठाणे, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील १४ शाळांतील १००० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.याद्वारे शिक्षणोत्सव साजरा करत अध्ययन स्तर विकास कार्यक्रमाला चालना देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
     
                  कोवीड शाळा बंद काळातील शैक्षणिक प्रयत्नांसाठी आकोली ही अमरावती विभागावर सन्मानीत शाळा आहे.नुकतीच शाळेची श्रावणी कांबळे ही विद्यार्थीनी नवोदय विद्यालय परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकली आहे.गुणवत्तेबरोबरच विविध सामाजिक कार्यातही शाळेचा नेहमी सहभाग राहिला आहे.त्याअनुषंगाने डोंगराळ भागात असलेल्या आकोलीच्या शाळेच्या पहिली ते सातवीच्या सर्व १३६ विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य भेट स्वरुपात देण्यासाठी निवड करण्यात आली.ह्या किटद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे संपूर्ण साहित्य पुरवण्यात आले.ह्या शैक्षणिक किटमध्ये दर्जेदार बॅग,विविध वह्यांचा संच,चित्रकला वही,रंगपेटी, पेन्सिल पाऊच किंवा कंपासपेटीसह विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय उपयोगी साहित्य मोफत प्रदान करण्यात आले.

                 या कार्यक्रमात नवोदयपात्र श्रावणी कांबळे हिला शाळेच्या शिक्षकांच्या वतिने एक हजार रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.अतिशय हर्षोल्लासात पार पडलेल्या ह्या साहित्य वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे औत्सुक्य व चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असाच होता.प्रसंगी शा. व्य. समितीचे उपाध्यक्ष शंकर राठोड, पो.पा. पंडीत धात्रक ,सरपंचा प्रतिनिधी देविदास जामकर, मु.अ. आनंदराव पोपुलवाड सह अनेक पालक उपस्थित होते.
         सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक तथा शिवप्रभाचे सदस्य नागेश मिराशे, स. शि. कैलास हाळे,संदिप सरवदे व पुंजाराम सावते यांच्यासह गावातील युवकांनी परीश्रम घेतले.सदर प्रेरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




"जंगलभागातील खऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना थेट मदत करणाऱ्या सर्व दात्यांची सामाजिक बांधिलकी पाहून आम्ही भारावलो.त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार"--- शंकर राठोड (पालक)


"आम्हाला पहिल्यांदाच अशी एवढी मोठी भेट मिळाली.आम्ही सर्व विद्यार्थी खूप खुश झालो.थॅंक्स शिवप्रभा!थॅंक्स ग्रॅन्ड मराठा!!"--- प्रांजली सावळे (विद्यार्थ्यांनी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News