Type Here to Get Search Results !

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल तर्फे अल्पोपहार अन्नधान्य साहित्य वाटप




आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल तर्फे अल्पोपहार अन्नधान्य साहित्य वाटप




दि. २२ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी.उपमुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते, राजकारणातील ' दादा ' व्यक्तिमत्त्व, पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचे चे शिल्पकार व भाग्यविधाते आदरणीय श्रीअजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा संचलित यशवंतराव चव्हाण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भोसरी,पुणे २६ येथील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल तर्फे अल्पोपहार अन्नधान्य साहित्य वाटप करण्यात आले व दादांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.




या कार्यक्रमाला पिं.चिं शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.श्री अजितभाऊ गव्हाणे, 
महीला शहराध्यक्ष मा.सौ कविताताई आल्हाट,मुख्यसंघटक मा. श्री अरुणभाऊ बो-हाडे, कामगार सेल शहराध्यक्ष श्री किरण चंद्रकांत देशमुख, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष संदीप शिंदे,भोसरी विधानसभा उपाध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड, कार्याध्यक्ष युवराजभाऊ पवार, आकाश पालकर , शिवाजी वलवणकर 
अर्बन सेलचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप इ.ऊपस्थित होते. या उपक्रमासाठी कामगार सेलचे नवनाथ शिंदे ,दामोदर वहिले, सुरेश झावरे, सोपान म्हेत्रे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी मदत केली. 




कृतिशील विचारांच्या गतिशील नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad