Type Here to Get Search Results !

वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता असे कोणी होने नाही




वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता असे कोणी होने नाही

      साधूचे कपडे घातल्यानंतर साधु होत असं नाही अगदी साधी राहनी नेहरू शर्ट ,पैजामा, टोपी घरूनच आणलेली पाण्याची बॉटल संस्थांमधील पाणीही न पीनारे मी पाहिलेले संस्थांचे अध्यक्ष म्हणजे कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील आज पूर्ण एक वर्ष होत आहे कर्मयोगी संत शिवशंकर भाऊ पाटील यांची प्राणज्योत आनंदात विलीन झाली आणि सर्व श्रींच्या भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला समर्थ सद्गुरू गजानन महाराज समाधीस्थ झाले त्यावेळेला जेवढे दुःख श्रींच्या भक्तांना झाले असेल अगदी तेवढे दुःख कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या जाण्याने झाले 
       पण जाताना मात्र संस्थानिकांना एक आगळावेगळा संदेश देऊन गेले कुठल्याही देवस्थानचा कारभार कसा असावा हा आदर्श गजानन महाराज संस्थान जवळून घ्यावा, स्वच्छता, शिस्त, शांतता ,अन्नदान, भजन ,कीर्तन, पंढरपूर पायदळ दिंडी सोहळा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक क्षेत्रात संस्थांची झालेली प्रगती, आनंद सागर , पंढरपूर, आळंदी, त्रंबकेश्वर,पंपासरोवर,तिर्थक्षेत्रील गजानन महाराज मंदिर व सर्वात महत्त्वाची संस्थांमध्ये निस्वार्थपणे सेवा करणारे सेवाभावी सेवाधारी हे सर्व नियोजन कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी कसे केले असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही 
   आणि हे सर्व करत असताना संस्थांमध्ये हयातीत व गेल्यानंतरही कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी नाही, फोटो नाही, साध नाव नाही हे फार आश्चर्य जनक आहे मी तर अस म्हनेल कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील हे साक्षात गजानन महाराजांनी पाठवलेले एक दैवी विभूती असायला पाहिजे आणि शुद्ध बीजापोटी आज कर्मयोगी शिव शंकर भाऊ पाटील यांच्या गेल्यानंतर त्यांचे सुपुत्र आदरणीय निळकंठ दादा पाटील संस्थांचा कार्यभार अगदी तंतोतंत वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन योग्य पद्धतीने चालवत असुन गजानन महाराज संस्थानचे भगवी पताका साता समुद्रा पार पोहोचतील अशी आशा सर्व श्रींच्या भक्तांना आहे आज सहज प्रथम पुण्यस्मरणाचे निमित्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या विषयी दोन शब्द लिखाण करण्याची संधी समर्थ सद्गुरु गजानन महाराज कृपेने प्राप्त झाली हे शब्द श्रींच्या भक्तांच्या चरणी समर्पित करतो 

श्रींचा ऐक भक्त श्री गणेश महाराज शेटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad