हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होणाऱ्या सतत मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे.काही कुटुंब बेघर झाले आहेत तर काहींची दुकाने सुद्धा नास्तनाभूत झाली आहे.
वसमत तालुक्यातील बालाजी मंदिर परिसरातील सत्याग्रह चौक येथील बसवेश्वर दूध डेअरी या दुकानाची भिंत कोसळून नास्तनाभूत झाली आहे गजानन नागनाथ स्वामी या डेअरी मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन डी फ्रीज व दुकानातील समानांची तोडफोड हि झाली जवळपास एक ते दीड लाखापर्यंत नुकसान झालय.
या गरजू व होतकरू डेअरी मालकाने आता काय करावे असा प्रश्न उपस्थित झालाय हि माहिती छावा युवा जिल्हाअध्यक्ष्य विजेंद्र भैया क्षीरसागर यांना कळताच त्यांनी त्या ठिकाणची पाहणी केली व शासनाने या डेअरी चालकास लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली आहे यावेळी छावादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.