Type Here to Get Search Results !

पंढरीच्या काही भागात आजही कचरा रस्त्यावरच, दुर्गंधी,घाणीचे साम्राज्य, नागरीकांचे आरोग्य धोक्यात!




पंढरीच्या काही भागात आजही कचरा रस्त्यावरच, दुर्गंधी,घाणीचे साम्राज्य, नागरीकांचे आरोग्य धोक्यात!

कचरा आणि दुर्गंधीयुक्त परिसर स्वच्छ करण्याची समाजसेवक संजय बाबा ननवरे यांची न. पा. प्रशासनाकडे मागणी




पंढरपूर शहरात सगळ्यात मोठी भरणारी आषाढी यात्रा संपून दहा दिवस झाले असले तरीही शहराच्या काही भागात आजही कचरा आणि दुर्गंधी अजूनही रस्त्यावरच आहे. यामुळे साथीच्या रोगाला व डेंग्यूच्या आजाराला आमंत्रण दिले जात असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करीत असल्याने समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाकडे सदरचा कचरा उचलून रस्ता स्वच्छ करून नागरिकांना सदर परिसर दुर्गंधी मुक्त करावा अशी मागणी केली आहे.




पंढरपूर शहरातील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराजवळचा परिसर त्याचबरोबर भुयाचा मारुती कडील रस्ता तसेच उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता, झेंडे गल्ली परिसर आदी भागात तसेच रस्त्यावर आषाढी यात्रा कालावधीत पडलेला कचरा,शिळेअन्न, पतरावळ्या,अशातच पावसाने या परिसरातील रस्त्यावर दल-दल झाली आहे. या सर्व प्रकारामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांनी थैमान घातले आहे. परिसरातील लहान मुलेही याच ठिकाणी खेळत असतात त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. साथीच्या रोगाला आमंत्रण देण्याचा हा प्रकार असून पंढरपूर नगरपरिषदेने लवकरात लवकर सदरचा कचरा उचलून हा रस्ता आणि परिसर स्वच्छ करावा अशी मागणी येथील रहिवासी तसेच सामाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी केली आहे.




91 इंण्डिया न्यूज साठी दिनेश खंडेलवाल पंढरपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad