Type Here to Get Search Results !

सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: काँग्रेस पक्षातर्फे दिली तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन




सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: काँग्रेस पक्षातर्फे दिली तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे




अतिवृष्टी व संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या घरांचे, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कोरपणा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांच्या नेतृत्वात आज कोरपणा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले प्रशासनाकडे मागणी केली 




नुकसान झालेल्या शेतीचा तसेच खरवडून गेलेल्या यांचा पंचनामा करून सरसकट पीक नुकसान करीता हेक्टरी 50 हजार रुपये तर शेती दुरुस्ती करिता हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावीत तथापि अतिवृष्टीमुळेच मौजा धानोली तांडा क्रमांक दोन रूपापेठ खडकी इतर गावांमध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहेत त्यांना देखील आर्थिक मदत देण्यात यावीत असे तालुका काँग्रेसच्या वतीने जनहितार्थ निवेदन सादर करण्यात आले यावेळी विजयराव बावणे सितारामजी कोडापे घनश्याम नांदेकर रोहप भाई संभाजी कोवे श्याम भाऊ रणदिवे उत्तमराव पेचे अविनाश गौरकार राहुल मालेकर रहमान गब्बर शेख सुरेश मालेकर गणेश जी गोडे विलास आडे अशोक मादसवार भाऊराव हरणे इस्माईल शेख विश्वास मालेकर आहे.आदी काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होते




यांनी तहसीलदारांसोबत तालुक्यातील पूरग्रस्तांची माहिती व चर्चा करण्यात आले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad