Type Here to Get Search Results !

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई कळमनुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या




सिमेंट रस्त्याचे देयक काढण्यासाठी चाळीस हजाराची लाच घेणाऱ्या कळमनुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह तिघांना पकडले, हिंगोली लाच लूचपत विभागाची कारवाई
 कळमनुरी येथील सिमेंट रस्त्याचे देयक काढण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांमार्फत चाळीस हजार रुपयाची लाच घेणाऱ्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह तिघांना हिंगोलीच्या लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. १५ दुपारी रंगेहात पकडले. उमेश कोठीकर असे मुख्याधिकाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.




याबाबत प्रतिबंधक विभागाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी शहरामध्ये पालिकेच्या वतीने एका कंत्राटदाराने सिमेंट रस्त्याचे काम केले होते. या सिमेंट रस्त्याची आठ लाख रुपयांची देयक झाले होते. सदर देयक काढण्याबाबत तंत्र दराने पालिकेचे मुख्याधिकारी कोठीकर यांना वारंवार विनंती केली मात्र त्यांनी चाळीस हजार रुपयांची मागणी केली. सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते.




या प्रकरणात तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यावरून उपाधीक्षक निलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार विजय उपरे, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे यांच्या पथकाने सपळा रचला. दरम्यान दुपारी दोन कर्मचाऱ्यांनी रक्कम घेऊन कोठीकर यांना दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने कोठीकर यांच्या कडून सदर रक्कम जप्त केली.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad