शेतकऱ्यांचा सहभाग महाराष्ट्र शासनाच्या अमृत वर्षा निमित्त कृषी विभागाच्या वतीने 25 जून ते 30 जून पर्यंत कृषी संजीवनी योजना मोहीम कृषी विभाग आत्मा व शासकीय यंत्रणेच्या सहभागातून ग्रामीण भागामध्ये राबविण्यात आली वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे उपक्रम संवाद किसान गोष्टी बांधावर चर्चा पीक पद्धती विकसित कृषी तंत्रज्ञान याबाबत प्रबोधन व रासायनिक खते कीटकनाशके बी बियाणे व सेंद्रिय शेतीचे प्रत्यक्षीक हवामान बदल व शेतीचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावात संवाद कार्यक्रम पार पडल्यानंतर कृषी क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त समारोपीय कार्यक्रम कुकडसाथ येथे शेतकरी भवन येथे पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ वंदना चवले सरपंच ह्या होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपसभापती राजू नैताम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचे आबिद अली यांनी बदलत्या हवामानाबद्दल शेती करणे आवश्यक असून वाढते तापमान व प्रदूषणामुळे पृथ्वी आकाश वायू जल जंगल जमीन यांची होणारी ऱ्हास ही चिंता वाढवणारी असून जागतिक मानकात भारतामध्ये 40% प्रदूषण मध्ये जीवन जगण्याची पाळी आलेली आहे ही धोक्याची घंटा असून जैविक विविधता जीव जंतू व मानव जातीला देखील याचा फटका बसत आहे प्रदूषणावर आळा घालण्यासाठी जंगल झाडे जगविने गरजेचे आहे.
यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या एफ पी ओ शेतकरी उत्पादक कंपनी हे उद्योजक व्हावे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उद्देश पुढे ठेवून वाटचाल करण्याची गरज विशद केली यावेळी बँक ऑफ इंडिया प्रशिक्षण केंद्राचे प्रफुल अलुरवार यांनी दारिद्र्यरेषेखालील व शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणातून आर्थिक समृद्धी करण्याची संधी युवकांनी लाभ घ्यावा अशी आवाहन केले अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच जम्प अलवार यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली व कुकुडसाथ या गावातील शेतकरी व परिसरात एसीएफ द्वारे राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली उमेद महिला द्वारे सक्षमीकरणासाठी राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
यावेळी कृषी मित्र तसेच नाविन्यपूर्ण सेंद्रिय शेतीमध्ये झालेल्या प्रगतीचे माहिती अनुभव शेतकऱ्यांनी कथन केले यावेळी तालुका मंडळ अधिकारी आळे सुपरवाजर मुंडे तसेच आत्मा चे बी टी एम पेंदाम यांनी कृषी विभागाच्या योजनेची माहिती दिली यावेळी परिसरातील शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या पेल्लोरा येथील शेतकरी जून घरी यांनी सेंद्रिय उसापासून गुळ उत्पादन करून त्यामुळे कशा पद्धतीने बाजार भावाचा व अधिक लाभ झाला याची माहिती दिली यावेळी कैलास कोरांगे भारत आत्राम उमेश राजूरकर यासह कृषी विभाग कर्मचारी शेतकरी महिला बचत गट सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन गर्जे यांनी तर आभार प्रदर्शन संदीप कांबळे यांनी मानले.
कुकुडसाथ येथे कृषी संजीवनी योजनेचा समारोप
कोरपना चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे