चार जिवलग मैत्रिणी एकाच वेळी गरोदर ; फोटो शेअर करत एक जण म्हणाली ...
सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतो . असाच एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत . या फोटोत चार जिवलग मैत्रिण गरोदर असल्याचं दिसत आहे .
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे असा योगायोग त्यांच्यासोबत एकदा नव्हे तर दोनदा घडला आहे . त्याचे फोटो आणि व्हिडीओ एका मैत्रिणीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत .
या चारही मैत्रिणी अमेरिकेतील आहेत . अमेरिकाच्या हवाई बेटावर राहणारी मॅडी कॅस्टेलानो एक टिकटॉकर आणि इंफ्लूएंसर आहे . तिने हा व्हिडीओ मैत्रिण रँडी पार्क , ब्रिटनी केंट आणि लू बीस्टोन यांच्यासोबत शेअर करत योगायोग सांगितला आहे . व्हिडीओमध्ये चार मैत्रिणींच्या गरोदरपणाचा फोटो शेअर करताना मॅडीने कॅप्शनमध्ये लिहिले की , तुमच्यापैकी काहींना आठवत असेल की , आपण सर्व जिवलग मैत्रिणी या आधीही एकाच वेळी गरोदर झालो होतो .
मॅडी पुढे म्हणाली की , आमचं पहिलं बाळंतपण एकमेकांपासून काही आठवड्यांच्या अंतराने झालं होतं . तेव्हा आमच्या मुलांना जन्मापासूनच एकमेकांचे चांगले मित्र मिळाले आहेत . आता पहिल्या मुलांच्या जन्मानंतर एक वर्षानंतर , या चार महिला मैत्रिणी एकत्र पुन्हा गर्भवती झाल्या आहेत आणि काही दिवसांनंतर त्या आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत .