विश्ववंद्य शिवराय प्रतिष्ठानच्या वतिने उमरखेड येथे राज्याभिषेक व शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न
मागिल वर्षी राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन उमरखेड , महागांव तालुक्यातील तरुणानी विश्ववंद्य शिवराय प्रतिष्ठानची स्थापना केली . आज प्रतिष्ठानचा वर्धापण दिन व छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन उमरखेड येथे साजरा करण्यात आला . अनेक वर्ष ह्या भूमीला स्वकीय राजा लाभला नाही . राजेशाहाजी व जिजामातेच्या प्रेरणेनी शिवरायांनी स्वराज्य निर्माण केल . ते एवढयावरच थांबले नाही सिंहासन निर्माण करुण परकीय आक्रमकांच्या मनसुबे धुळीला मिळविले . अशा महाण शिवछत्रपतीचा राज्यारोहन दिन जन जन जागृतीचा व गौरवाचा दिन सामाजाची चेतना जागृती साठी प्रेरक व दिशादर्शक आहे म्हणुणच प्रतिष्ठानच्या वतिने राज्याभिषेक सप्ताह सोहळा ६ जुन ने १२ जुन ह्या कालावधीत उमरखेड तालुक्यातील गावागावात साजरा करण्यात आला . ह्याच सप्ताहाचा समारोपिय कार्यक्रम आज जाहीर व्याख्यानाने आर्य वैश्य भवण उमरखेड येथे संपन्न झाला .
आजच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुण उमरखेड महागांव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार नामदेवराव ससाने होते तर प्रमुख वक्ते म्हणुण प्राध्यापक उमाकांत होनराव सर संचालक रिलायन्स अकॅडमी लातुर हे होते .विश्ववंद्य शिवराय प्रतिष्ठनचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,यात प्रतिष्ठानच्या स्थापनेमागचा उद्देश, प्रतिष्ठानचे मागच्या वर्षभरातील काम याबद्दल सांगितले. तसेच तरूणांच्या टिमने ह्या सप्ताहात विविध गावात राज्याभिषेक उत्साहात साजरे केल्यामुळे गावोगावच्या टिमचे त्यांनी तोंडभरुण कौतुक केले . तसेच प्रतिष्ठानच्या कार्यासाठी सदैव सहकार्य असु दयावे असे अव्हाहनही त्यानी केले .प्रमुख वक्ते प्राध्यापक उमाकांत होणराव सरांच्या व्याख्यानाणे शिवप्रेमी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या ओजस्वी वाणीतुन त्यानी हिंदुजागृतीसाठी हा उत्सव अत्यंत महत्वाचा असुन सिंहासन निर्माण झाल्याने सिंहासनाची परंपरा निर्माण झाली त्यामुळे औरंगजेबाला धक्का बसला . शिवप्रभूचा दैदिप्यमान इतिहास राष्ट्रभक्तीसाठी अंत्यत महत्वाचा आहे .
रामकृष्ण ज्या सिंहासणावर बसुन राज्यरोहन केल तेच सिंहासन विदर्भ कन्या जिजामातेच्या पुत्रान निर्माण केल .भारताच्या स्वराज्याची पुनर्स्थापना करायची असेल तर मावळ्यांची भूमिका काय याबद्दल त्यांनी श्रोत्यांना संबोधित करतांना जाणिवेचा एक विचार दिला . प्रतिष्ठानच्या कामात शिवप्रेमी सक्षमरित्या उभे राहुन काम करत आहेत त्याच ही कौतुक केल .अध्यक्षीय भाषणात लोकप्रिय आमदार नामदेव ससाणे यांनी विस्तृत विचार मांडताना म्हणाले त्या काळात शिवरायांनी केलेल कार्य आज ही प्रेरणादाई व प्रासंगिक आहे .
महाराजानी हिंदवी स्वराज्य उभ करूण शत्रुचे मनसुबे धुळीस मिळविले त्यांच्यामुळेच आपण आहो ही जाणीव आपणा प्रत्येकाला असावी .प्रतिष्ठानच्या कार्याचे आणि कार्यक्रमाच्या तयारीचे कौतुक केले, तसेच शिवरायांच्या दैदिप्यमान ऐैतीहासिक वारसा यावर विचार मांडले . तसेच प्रतिष्ठानच्या कार्यासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे असे ही ते म्हणाले . हया कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनाचा शिवरत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .
जि.प शाळा बिटरगांव (खु )औंदुबर वृक्ष संवर्धन समिती , बंदिभाग विकास समिती मोरचंडी , जनसहयोग शेतकरी उत्पादक संघ बेलखेड , विडुळ शेतकरी उत्पादक संघ , अजय बेदरकर सर यांचा गौरव प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आला .कार्यक्रमात गित राम मिराशे सर यांनी ,कार्यक्रमाचे संचालन अतिशय उत्तमरित्या निशांत तालंगकर यांनी केले व आभार सुहास वाघमारे पर्जना ह्यानी मानले .
कार्यक्रमास उमरखेड महागांव तालुक्यातील शिवप्रेमी उपस्थित होते . विश्वाच्या मांगल्याची प्रार्थना करत पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.