Type Here to Get Search Results !

Madha | नॉर्वे स्थित इंटरनॅशनल यारा कंपनीचे संचालक डॉ . मार्टिन यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

नॉर्वे येथील प्रसिद्ध असलेली यारा इंटरनॅशनल कंपनी शेतकऱ्यांसाठी भारतात व इतर देशात मार्गदर्शन वर्ग घेत असते बेंबळे येथील व्ही . एस . आय ( वसंतदादा इन्स्टिट्यूट ) पुरस्कृत प्रगतशील शेतकरी सोमनाथ हुलगे यांच्या शेतावर शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता यावेळी यारा इंटरनॅशनल कंपनीचे संचालक डॉ . मार्टिन यांनी विद्राव्य खते कशी वापरावीत बद्दल माहिती दिली .




आगामी काळात यारा कंपनी शेतकऱ्यांना कमी खर्चात परवडेल असे प्रॉडक्ट आणणार आहे त्याबद्दल त्यांनी सविस्तर अशी माहिती दिली . त्यांनी सांगितले ब्राझील , मेक्सिको , चायना या देशात त्यांना बऱ्यापैकी यश भेटले आहे हे प्रॉडक्ट आपण येत्या काळात भारतात आणणार आहोत .




तुम्ही शेतीमध्ये साध्या पद्धतीने काम करता तसेच सिम्पल सोलुशन मध्ये दोन किवा तीन प्रॉडक्ट वापरून पिकाची संपूर्ण गरज भागवली जाईल अशा पद्धतीने आपण विद्राव्य खते आणणार आहोत . शेतकऱयांच्या प्रश्नावर त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली . सोमनाथ हुलगे यांच्या ऊस व केळी या प्लॉटला त्यांनी भेट दिली पुढे बोलताना म्हणाले मी सतत वेगवेगळ्या देशांना भेट देत असतो असतो पण तुमची शेती करण्याची फर्टिगेशन सिस्टिम , ऊस पद्धत , पिकामध्ये एकरी 117 टन आवरेज व केळी पिकामध्ये एकरी 40 टनापर्यंत आवरेज घेता हे खूपच प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले .





यावेळी यारा कंपनीचे पवितरसिंग माथरू योगेश शि रोळे विकास खैरनार , स्वप्निल घोरपडे • सागर भोर , निखिल खोळंबे , त्याचबरोबर कृषी सहाय्यक क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा . तालुका कृषी अधिकारी हनुमंत भोसले यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News