Type Here to Get Search Results !

सिना भोगावती नदीवरील कोल्हापुरी पध्दतीचे बंधाऱ्याचे लवकरच पुनर्भरण होणार

सिना भोगावती नदीवरील कोल्हापुरी पध्दतीचे बंधाऱ्याचे लवकरच पुनर्भरण होणार






मोहोळ तालुक्यातील सिना नदीवरील बोपले या ठिकाणी नवीन बंधाऱ्यावरुन बॅरेज बांधुन त्या बॅरेजमधून भोगावती नदीवरील तडवळे (ता.बार्शी) या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात येईल.


त्यामधून तडवळे देगाव डिकसळ- नरखेड व भोयरे अश्या चार बंधाऱ्यामध्ये पाणी सोडल्याने तडवळे यावली मंगोळी होराळे देगाव वाळूज डिकसळ-नरखेड घोरपडी व भोयरे या गावातील ६ हजार ७००हेक्टर एवढे क्षेत्र ओलिताखाली भविष्यात येण्यास मदत होणार आहे. 







संदर्भात बुधवार दि १ जून रोजी मुंबई उपमुख्यमंत्री यांच्या दालनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार साहेब व राज्याचे जलसंपदा मंत्री मा ना श्री जयंतराव पाटील साहेब,माजी आमदार श्री राजनजी पाटील मालक व आमदार श्री यशवंत (तात्या)माने व जलसंपदाचे कार्यकारी संचालक राजपूत व नियोजन व अर्थ विभागाचे सचिव यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती योजनेचा सर्वेक्षणाचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याच्या सूचना देखील या बैठकीत उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार साहेब व जलसंपदा मंत्री मा ना श्री जयंतराव पाटील साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


 यावेळी या बैठकीस तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,सोलापूर जिल्हा दुध संघाचे व्हा चेअरमन दीपकदादा माळी,मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अस्लम चौधरी,अनिल कादे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad