Type Here to Get Search Results !

करोळे गावामध्ये मिरे गावची कन्या क्रिकेटर किरण नवगिरे व नायब तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड यांचा नागरी सत्कार संपन्न

करोळे गावामध्ये मिरे गावची कन्या क्रिकेटर किरण नवगिरे व नायब तहसीलदार सिद्धार्थ गायकवाड यांचा नागरी सत्कार संपन्न





करोळे प्रतिनिधी:
करोळे गावामध्ये नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामजिक संघटनेच्या वतीने व समस्त करोळे ग्रामस्थांच्या वतीने मिरे गावची कन्या किरण प्रभू नवगिरे यांची महिला क्रिकेट T 20 चॅलेंज मध्ये निवड झाल्याबद्दल तसेच MPSC मधून नायब तहसिलदार पदी निवड झाल्याबद्दल मा.सिद्धार्थ गायकवाड साहेब यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता.




या कार्यक्रमासाठी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे,नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्यसचिव वैभवजी गीते साहेब, उस्मनाबाद एनडीएमजे जिल्हाअध्यक्ष अजिनाथजी राऊत, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,,पत्रकार बांधव तसेच गावतील सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ,सर्व समाजातील नेते, पुढरी उपस्थित होते.


विकास दादा धाइंजे किरण नवगिरे चे कौतुक करताना म्हणले की एक गरीब सामान्य बहुजन कुटुंबातील मुलगी तिच्या जिद्दी आणि चिकाटीने मेहनितीने तिथेपर्यंत पोहचली. व महिला क्रिकेट मध्ये ती भविष्यत भारताची कर्णधार म्हणून नेतृत्व करताना दिसेल असे म्हणले व नायब तहसिलदार मा.सिद्धार्थ गायकवाड साहेब यांचे ही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


तसेच वैभवजी गीते साहेब कौतुक करताना म्हणले की झुंड पिक्चर मध्ये झोपडपट्टीतील मुलाना फुटबॉल खेळण्याची संधी मिळत नसती, आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचे सोने करतात अशी ही किरण नवगिरे आहे तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशा शब्दांत व्यक्त केले.


किरण नवगिरे बोलताना म्हणली की महिला क्रिकेट मध्ये भारताला विश्वचषक जिंकता आला नाही तो जिंकून देण्याचं स्वप्न् असलेचे सांगितले.
हा कार्यक्रम नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने घेण्यात आला.


कार्यक्रमासाठी सागर गायकवाड,संतोष कदम,पांडुरंग शिंगटे,मगन दगडे, पिनु शिंगटे, पोपट शिंगटे,पांडुरंग शिंगटे,हरी दगडे,शहाजी पवार,कुंडलिक साठे,रतीलाल बनसोडे,परमेशवर शिंगटे, सुनिल कोळी,बापू कोळी,विनोद गायकवाड, समाधान नवगिरे, धनाजी शिवपालक,श्याम काळे, डॉ.सर्जेराव गायकवाड,सूनिताताई खलसे,सरपंच स्वातीताई यमगर धाईंजे मॅडम,अक्षय सावंत,जगदीश नवगिरे,शुभम नवगिरे,पिंटू नवगिरे, पोपट नवगिरे, जयकुमार नवगिरे,प्रेम साठे,अनिल नवगिरे,परमेश्वोर गेजगे, सुशांत नवगिरे,सुमित नवगिरे,दादा गुरव इ ग्रामस्थ उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नवगिरे-पाटील यांनी केले व आयोजन बबन नवगिरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad