Type Here to Get Search Results !

म्हशीच्या व्यवहारातून अकलूजच्या तरुणावर जीवघेणा हल्ला पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

म्हशीच्या व्यवहारातून अकलूजच्या तरुणावर जीवघेणा हल्ला पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल




पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे अकलूजचे आसीफ कुरेशी यांच्यावर म्हैस खरेदीच्या कारणावरून जीवघेणा हल्ला झाल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे अकलूज येथील राहणारे आसिफ कुरेशी हे जनावरांचा व्यापार करतात ते म्हशीचा व्यापार करण्यासाठी भाळवणी येथे आले त्यांनी म्हशीचा व्यवहार केला दरम्यान वेळापूर येथील जनावरांचा व्यवसाय करणारे शेख यांनी सदर ठिकाणी येऊन व्यवहार झालेल्या म्हैससाठी म्हैस मालकास कुरेशी यांच्या पेक्षा दोन हजार रुपये जास्त देऊन ती म्हैस खरेदी केली. यानंतर कुरेशी आणि वेळापूर येथील शेख या जनावरांच्या व्यापार करणाऱ्या मध्ये वादावादी सुरू झाली. याचे भांडणात रूपांतर होऊन वेळापूर येथील जनावरांच्या व्यापाऱ्यांनी स्वता कडील चाकूने कुरेशी यांच्यावर हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 




कुरेशी यांचे दोन बंधू भांडण बसून मिटवू वाद घालू नका मारामारी करू नका असे म्हणताच त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पिराची कुरोली फाटा या ठिकाणी घडला. दरम्यान वेळापूर येथील जनावरांचा व्यापार करणारे शेख यांनी कुरेशी यांना तुम्ही आमच्या भागामध्ये गुरे घेण्यास का आला आहे. इकडे यायचा तुमचा संबंध काय आहे. असे म्हणत कमरेला लावलेला चाकू काढून आसिफ कुरेशी यांचे पोटात उजव्या बाजूस खुपसला तसेच मारहाणही करण्यात आली यावेळी प्रसंगावधान राखून सलीम कुरेशी व त्यांचे बंधू यांनी त्यांना वेळापूर येथील माने यांच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले सदर घटनेची फिर्याद पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पंढरपूर ग्रामीण पोलिस करीत आहेत.

या घटनेची माहिती देताना अश्पाक सलीम कुरेशी म्हणाले की........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad