Type Here to Get Search Results !

फलटण | तालुक्यातील शिवसैनिकांची निष्ठा शिवसेना आणि ठाकरें बरोबरच : प्रदिप झणझणे

फलटण तालुक्यातील शिवसैनिकांची निष्ठा शिवसेना आणि ठाकरें बरोबरच : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख




उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माणूस इतिहासच घडवणार आहे. ते कपटी, कट-कारस्थानं करणारापैकी नाहीत. भाजप पडद्या आडुन शकुनीसारखा खेळ खेळत आहे. भाजपने शिवसेनेच्या घरात बंडाचं वादळ उभं केलं आहे. धुरळा उडवलेला आहे. त्यामुळे शकुनी अजुन स्पष्ट काही दिसुन येत नाही. पण लक्षात ठेवा सर्व काही शांत होईल तेव्हा सर्व काही स्वच्छ आणि पारदर्शक स्पष्ट चित्र असेल. जिंकलं तरच समोर यायचं आणि हरलं की वो हमने और हमारे कार्यकर्ताओंने नही किया है, हमारा इसमे कोई हाथ नही है | अशी भुमिका यांची नेहमीचीच असते. त्यांनी लक्षात ठेवावं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निस्वार्थी व स्वच्छ व्यक्तीमत्व आहे, आतापर्यंत शिवसेनेवर आलेली बंड त्यांनी मोडीत काढुन शिवसेना पुढे न्यायचं काम केलं आहे. हे बंड देखील उद्धवसाहेब व शिवसैनिक लवकरच संपुष्टात आणतील. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पिसाटलेलं सध्याचं राजकारण आणि लोकशाहीच्या झालेल्या चिंध्या पाहुन इतिहास देखील लाजला असेल. हे सर्व पाहुन असंच वाटतंय की शिवसेनेनं सर्व काही दिलेल्या एकनाथ शिंदेना पहायला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच हवे होते. पण भाजप आणि बंडखोर आमदारांनी लक्षात ठेवावं, तुमची गाठ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांशी आहे.

फलटण तालुक्यातील एकही शिवसैनिक फुटणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. इथे कोणीही शिवसेनेचा गद्दार नाही. महाराष्ट्रातील व फलटण तालुक्यातील शिवसैनिक उद्धवसाहेबांबरोबरच आहे. शिवसेना आणि उद्धवसाहेबांची कोणाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. शिवसेना महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे आवश्यक आहेत. बाकी संघर्ष करायला निष्ठावान व कट्टर शिवसैनिक समर्थ आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे गणित माहित आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हा एकमेव चेहरा खरा व प्रामाणिक वाटत असुन महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त करणारा आहे, दिशा देणारा आहे, आधार देणारा आहे असंच संपुर्ण महाराष्ट्राचं मत आहे.

               
प्रदिप हरिभाऊ झणझणे,
शिवसेना फलटण तालुका प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News