Type Here to Get Search Results !

सोलापूर | प्रादेशिक बेसिक पोलिसिंगवर भर देणार सुधिर हिरेमठ यांनी स्वीकारला आयुक्तांचा अतिरिक्त पदभार

प्रादेशिक बेसिक पोलिसिंगवर भर देणार हिरेमठ यांनी स्वीकारला आयुक्तांचा अतिरिक्त पदभार




सुधीर हिरेमठ सोलापूरचे सुपुत्र संचार प्रतिनिधी सोलापूर , दि . १- कडक शिस्तीचे खाते म्हणून पोलीस दलाची ओळख असून नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने बेसिक पोलिसिंगवर भर देणार असल्याचे पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले .

अतिरिक्त आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधला . दरम्यान , शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे हे निवृत्त झाल्याने त्यांच्याजागी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांची नियुक्ती करण्यात आली .


हिरेमठ म्हणाले , सोलापूर हे माझे ' होम टाऊन ' आहे . त्यामुळे येथे काम करताना चांगला अनुभव येणार आहे . शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाईल .

मी पुणे सीआयडी येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत आहे . सोलापूरचे पोलीस आयुक्त निवृत्त झाल्याने अतिरिक्त पदभार माझ्याकडे देण्यात आला आहे . मिळालेल्या संधीचा चांगला फायदा सोलापूरकरांसाठी करण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला जाईल , असेही आयुक्त हिरेमठ यांनी सांगितले .


कोरोनामुळे पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांची परेड योग्य पध्दतीने होत नाही त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे . वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजे . ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत आहे . त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे , असेही हिरेमठ यांनी सांगितले .

प्रारंभी सोलापूर क्राइम रिपोर्टर असोसिएशनच्यावतीने नवे पोलीस आयुक्त हिरेमठ यांना टर्किश टॉवेल , बुके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले .


अतिरिक्त पोलीस आयुक्तपदावर रूजू झालेले सुधीर हिरेमठ हे सोलापूरचे सुपुत्र असून त्यांचे बालपण सोलापूर शहरात गेले आहे .


ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत . त्यांचे शालेय शिक्षण श्राविका विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयात झाले आहे . २००७ मध्ये भारतीय पोलीस दलात सहभागी झाल्यानंतर त्यांनी भंडारा , अकोला , गडचिरोली येथे कर्तव्य बजाविले .


वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी पार पाडली त्यानंतर पदोन्नतीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून काम केले . सध्या ते पुणे सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad