Type Here to Get Search Results !

औंढा नागनाथ l पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी




औंढा नागनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तीन जूनला शहराच्या प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होते. 




मिरवणुकीपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर सजवलेल्या वाहनातील प्रतिमेची भंडारा उधळून व पुष्पहार घालून धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, नगराध्यक्ष कपिल खंदारे यांनी पूजन केले. 




यावेळी उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, संपर्कप्रमुख व राजेंद्र शिखरे, श्रीराम बांगर, शशिकांत वडकुते, अडवोकेट रवी शिंदे, लखन शिंदे, गंगाधर पोले,गजानन पोले,सीमा पोले, किरण पोले,गोपाल बिरगड, राहुल पोले, सुनील पोले,राहुल पोले, गजानन नाईक, शिवाजी बिरगड, शरद पोले, आद्दीसह समाजबांधवांची उपस्थिती होती. 





ही मिरवणूक नगरपंचायत प्रांगणामधून देशमुख गल्ली डॉक्टर हेडगेवार चौक जुने बस स्थानक नवीन बस स्थानक मार्गे नागनाथ मंदिर परिसरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.




 मिरवणुकीतून उंट मेंढपाळ,अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत मुली घोड्यावर बसल्या होत्या, यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषाने औंढा नगरी दुमदुमली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad