Type Here to Get Search Results !

पंढरपूर | विठ्ठल परिवाराची बैठक : गट - तट एकत्र येणार का ? दुफळी कायम राहणार राष्ट्रवादीचे भालके यांच्या मदतीला भाजपचे महाडिक

• विठ्ठल परिवाराची उद्या बैठक : गट - तट एकत्र येणार का ? दुफळी कायम राहणार राष्ट्रवादीचे भालके यांच्या मदतीला भाजपचे महाडिक




पंढरपूर : वेणूनगर - गुरसाळे ( ता . पंढरपूर ) येथील विठ्ठल साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे . त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून विस्कळीत असलेल्या विठ्ठल परिवाराच्या निवडणुकीबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक भाजपचे बोलाविली आहे . राष्ट्रवादीच्या ताब्यातील कारखान्याच्या बैठकीला राज्यसभा उमेदवार धनंजय महाडिक यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरणार आहे . स्व . आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या • मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पंढरपूर राष्ट्रवादी व विठ्ठल परिवारामध्ये उभी फूट पडली होती . एकमेकांवर झालेले आरोप प्रत्यारोप , खेचाखेचीच्या राजकारणामुळे हातची जागा गमविण्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली होती . त्यानंतर आर्थिक अडचणीत असलेल्या विठ्ठलच्या राजकारणातही त्याचे पडसाद पडून एकमेकांवर जोरदार चिखलफेक करण्यात आली होती . येणाऱ्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारामध्ये फूट पडून संचालक युवराज पाटील , राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील , राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी स्वतंत्र पॅनल टाकण्याची घोषणा केली . तर मागील काही दिवसांपूर्वी विठ्ठल परिवाराचे नेते असलेले सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी त्यांच्या गटाची स्वतंत्र बैठक घेत स्वतंत्र निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी केली होती . या सर्वांवर विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके मात्र थांबा आणि पहाच्या भूमिकेत होते . विठ्ठलची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी २ जून रोजी विठ्ठल परिवाराची पंढरपुरात निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी , आजी - माजी संचालकांची बैठक बोलाविली आहे .




विठ्ठल परिवारातील प्रमुख पदाधिकारी , कार्यकत्यांची बैठक बोलावली आहे . याचे निमंत्रण सर्वांना दिलेले आहे . तरीही कोणी नाराज असतील तर त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली जाईल . यापूर्वी काही गटांनी स्वतंत्र बैठका घेतल्या असतील तर त्यांचा तो अधिकार आहे . मात्र निवडणुकीचा निर्णय घेताना सार्वत्रिक निर्णय घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ . सर्वजण उपस्थित राहतील , याची खात्री आपणाला आहे . - भगीरथ भालके , अध्यक्ष , विठ्ठल कारखाना





मी सध्या राज्यसभा निवडणुकीच्या बैठकांमध्ये व्यस्त आहे . विठ्ठल कारखान्याच्या विचारविनिमय बैठकीसाठी उपस्थित राहायचे की नाही , याबाबत आपण नंतर बोलू . धनंजय महाडिक अध्यक्ष , भीमा कारखाना






विठ्ठल परिवाराच्या बोलाविलेल्या बैठकीचे नियोजन आम्हाला विचारून केले नाही . आम्हाला त्याचे निमंत्रणही नाही . त्यामुळे आम्ही जाण्याचा प्रश्नच नाही . मी स्वतः ॲड . गणेश पाटील , ॲड . दीपक पवार मिळून स्वतंत्र पैनल टाकणार आहोत . त्यामध्ये आता बदल | होणार नाही . त्यामुळे आमच्या सोबत जे येतील त्यांना सोबत घेऊन पुढची रणनीती ठरविण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे . - युवराज पाटील संचालक , विठ्ठल कारखाना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad