राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महिला संघटनेची बैठक राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पार पडली.
महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला.
यावेळी २०२४ च्या निवडणुकीचे ध्येय नजरेसमोर ठेवून स्थानिक पातळीवर महिला संघटना बळकट करण्यासाठी काम करावे, अशा सूचना सुप्रियाताईंनी केल्या. तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात कशा पद्धतीने काम करावे याचे मार्गदर्शन सुप्रियाताईंनी केले.
यावेळी राष्ट्रीय सचिव आशाताई मिरगे, राज्य समन्वयक सुरेखाताई ठाकरे, राज्य समन्वयक आशाताई भिसे, विभागीय महिलाध्यक्ष ऋता आव्हाड, वैशाली मोटे, वैशाली नागावडे, वर्षा निकम, अर्चना घारे, शाजिया शेख, शाहीन हकीम, प्रा.कविता म्हेत्रे, डॉ.ज्योती खेडेकर, यामिनी देवकर तसेच जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, निरीक्षक आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.