आकोली येथे तलाठी गजानन सुरोशे यांचा सत्कार
उमरखेड तालुक्यातील आकोली या गावामध्ये गजानन सुरोशे हे सात वर्षापासून तलाठी म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी आकोली येथे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा कसा वेळ व पैसा वाचेल या उद्देशाने त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम गावामध्ये राबविले या मध्ये शेतकर्यांना मोफत सातबारा वाटप विध्यार्थ्यांना मोफत दाखले हे गावात कॅम्प लावून वाटप केले व तसेच कोरोना काळात जिवाची पर्वा न करता शंभर टक्के लसीकरण करून घेतले बर्याच विधवा अपंग व्यक्तींना वेगवेगळ्या योजने अंतर्गत अनुदान प्राप्त करून दिले याच बरोबर आकोली हे गाव दूस्काळ मुक्त करण्यासाठी गावामध्ये. एकोपा आणुन श्रमदानातून गाव तलाव तयार केले
गावात शेतकर्यांचे तंटे हे गावातच मिटवण्यासाठी पर्यंन्त करून निपटारा करायचे या मुळे तलाठी गजानन सुरोशे साहेब हे नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असायचे हे सर्व पाहुन वरीष्ठ अधिकारी यांनी गजानन सुरोशे साहेब यांना पदोन्नती देऊन मंडळ अधिकारी या पदावर नियुक्ती केली ही पदोन्नती आणि गावातील सामाजिक कार्य पाहुन आकोली वाशी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी उमरखेड प. स. माजी सभापती प्रविण पाटील बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रताप भोस सोनदाभी आरोग्य केंद्राचे अधिकारी शिक्षक ग्रामसेवक ग्रामपंचायत चे सरपंच सर्व सदस्य व गावातील नागरीक उपस्थित होते
प्रतिनिधी निगंनुर मैनोदिन सौदागर ता उमरखेड जि यवतमाळ