कारला ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्ष पणामुळे गावात घाणीचे साम्राज्य
प्रतिनिधी जांबुवंत मिराशे
कारला ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्ष पणामुळे गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून परिणामी नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे यामुळे लहान बालकांना मोठ्या प्रमाणात मच्छरांचा त्रास सहन करावा लागत आहे
झोपेत असलेल्या सरपंच ग्रामसेवक यांनी गावाच्या विकास कामात लक्ष देऊन सर्वसामान्य स्थानिक नागरिकांना होत असलेल्या त्रासातुन सुटका करावी
गटारीतून येणारे घाणीचे पाणी हनुमान मंदिरासमोरील नालीत पाणी साचून ते पाणी रस्त्यावर येत असल्याने त्या पाण्यापासून येणाऱ्या वासा पासून व पसरणाऱ्या रोगराईमुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे
लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या म्हणीप्रमाणे सरपंचांनी चक्क अकलेचे तारे तोडत
अगोदर कर वसुली करा नंतरच नाली साफ करू अन्यथा करता येणार नाहीत असा तोंडी फतवाच सरपंच महोदयांनी कारला वासियांना काढला आहे