Type Here to Get Search Results !

वसमत | महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या मूलभूत प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्व दुर्लक्ष

वसमत | महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या मूलभूत प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्व दुर्लक्ष होत असल्याने भीम आर्मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने वसमत येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा




महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागासवर्गीयांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून महाविकासआघाडी आघाडी सरकार मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने खालील मागण्या घेऊन आंदोलनाचा मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

1)मागील दोनवर्षांपासून ग्रामीण व शहरी भागात रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर जाले आहे परंतु आजपर्यंत अद्याप लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही मंजूर झालेल्या लाभार्थ्याना तात्काळ घरकुलाचे अनुवाद उपलब्ध करून द्यावे.




2)जातीयवादी अत्याचाराला बळी पडलेल्या कुटुंबाना ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत जे आर्थिक सहाय्य मंजूर झाले आहेत अश्या पीडित कुटुंबाचे तात्काळ आर्थिक सहाय्य त्यांच्या खात्यावर वर्ग करा.

3)महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळा कडून व्यावसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर जाले आहेत परंतु आजपर्यंत एकाही लाभार्थ्यांना कर्ज मिळाले नाही त्यामुळे कर्जाची रक्कम तात्काळ उपलब्ध करून द्यावी.






4)मागासवर्गीय समाजाच्या मुलां-मुलींच्या वसतीगृहाचि जमीन खरिदिसाठी निधी मंजूर होऊन सात वर्ष पूर्ण झाले परंतु आजपर्यंत जमीन खरिदिची अद्याप काहीच कार्यवाही झाली नाही त्यामुळे कन्हेरगाव शिवारातील शासकीय जमीन गट क्रमांक 70 मधील 26 हेक्टर 11 आर पैकी 2 हेक्टर जमीन वसतिगृहासाठी उपलब्ध करून द्यावी.




5) वसमत शहरालगत गणेशपुर रोडवर असलेल्या शासकीय महिला रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे

या मागणीन्याठी दिनांक 21/06/2022 रोज मंगळवार सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आसेगाव कॉर्नर येथे संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करत असल्या बाबतचे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आले त्यावेळी संघटनेचे महराष्ट्र प्रदेश सचिव आनंद खरे, जिल्हा प्रमुख हिंगोली मास्टर महेंद्र गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष निवृती ढेंबरे, जिल्हा सचिव प्रदीप मस्के , तालुका प्रमुख वसमत किशन खरे, तालुका उपाध्यक्ष नवनाथ घाते, ता.शो.मि.प्र.वसमत हर्षद आझादे, आझाद समाज पार्टीचे वसमत तालुका प्रमुख रूपेश सरोदे,विशाल रनखांब,राहुल खंदारे,देवानंद मुळे ,संविधान जोंधळे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad