Type Here to Get Search Results !

हिमायतनगर | कारला येथील ग्रामसेवकांचे जिल्ह्याच्या ठिकाणावरून अपडाऊन. मुख्यालयी राहत नसल्याने कामे खोळंबली... अपडावून थांबवा ग्रामस्थांची मागणी

कारला येथील ग्रामसेवकांचे जिल्ह्याच्या ठिकाणावरून अपडाऊन.
मुख्यालयी राहत नसल्याने कामे खोळंबली... अपडावून थांबवा कार्यकर्त्यांची मागणी






हिमायतनगर प्रतिनिधी :- जांबुवंत मिराशे

कारला येथील ग्राम विकास अधिकारी हे चक्क जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कारला. पिचोडी .सह वारंगटाकळी. येथील कारभार पहात असून परिणामी नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की शासन नियमानुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना मुख्यालय तर सोडाच तालुके ठिकाणीसुद्धा आता चक्क शंभर किलोमीटर अंतरावरील जिल्ह्याच्या ठिकाणावर राहुल ग्रामीण भागातील कारभार पाहणारे अनेक अधिकारी-कर्मचारी आहेत त्याचाच भाग म्हणून हम भी कुछ कम नही असे म्हणतात कारला चिचोंडी याच बरोबर वारंग टाकळी येथील ग्रामसेवक यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कारभार पाहत असल्याने गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.


तहसील, पंचायत समिती,कर्मचारी हे रेल्वे वेळा पञकानुसार कार्यालयात येत असून आणि तिन वाजेच्या दरम्यान नांदेड प्रयाण होत असल्याने सर्व सामान्यांच्या कामाचा खोळंबा होत असुन याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी समोर येत आहे . त्याचबरोबर पंचायत समितीचे अभियंता याच्यासह तहसील चे कर्मचारी हे सकाळी पॅसेंजर ने आकरा वाजता आफीसला येवून तिन वाजेच्या नंदिग्राम एक्सप्रेस ने नांदेड प्रयाण होत आहेत.


या तक्रारी अनेक वेळा करून सुध्दा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदरील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून राहत असल्याचे दाखवून शासनाचे हजारो रूपयांचे भाडे कागदोपत्रीच दाखवत भाडे उचलून अपडावून करीत आहेत.त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांची कामे वेळेत होत नसुन तिन वाजेच्या नंतर तहसील, पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. या गंभीर बाबीकडे तहसीलदार महोदय .व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी. यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी .व अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे घरभाडे देऊ नये अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News