उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील,माजी मंत्री संजयभाऊ राठोड,शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख परागभाऊ पिंगळे,यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल एडगे साहेब यांच्या संकल्पनेतून व शिवसेना नेते प्रा.मोहन मोरे सर यांच्या सहकार्यातून महागाव तालुक्यातील कोठारी,बेलदरी,उटी,आमनी,शिरपुली गावातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाना त्यांच्या बांधावर जाऊन बियाणे वाटप करण्यात आले
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,विभाग प्रमुख नितीन उबाळे,शिवसेना समर्थक प्रल्हाद भवरे,खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी चंद्रसेन आढागळे,तलाठी वाघमारे,कोतवाल प्रमोद काळे,दिलीप आडे,अशोक आडे,कोठारी चे सरपंच अर्जुन राठोड,रोहिदास राठोड,तलाठी खोकले,तलाठी दिवेकर,तलाठी पाचंगे,सचिन उबाळे,शाखा प्रमुख रणखांब व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




