Type Here to Get Search Results !

वसमत | शहराला वीटभट्टीचा विळखा | वीट भट्टीच्या धुरामुळे अपघाताच प्रमाण वाढलं

वसमत शहराला वीटभट्टीचा विळखा

वीट भट्टीच्या धुरामुळे अपघाताच प्रमाण वाढलं
हिंगोलीच्या वसमत शहराला सध्या विट भट्ट्याच्या प्रश्‍नान ग्रासलय.




या वीटभट्ट्याच्या धुरामुळे नागरिकांना श्वासाचा त्रास सहन करावा लागतोय.

तसेच वीटभट्टीच्या धुरामुळे अपघाताच प्रमाणही वाढलय या वीटभट्ट्या दूर करण्यासाठी अनेकदा निवेदनही देण्यात आली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही या वीटभट्ट्या दूर करण्यासाठी काही वर्षांपूर्वी एका तरुणाने आत्मदहनाचाही प्रयत्न केला होता.




या वीटभट्टीचा धुरामुळे पर्यावरणाचा नाश तर होतोच आहे पण नागरिकांना कित्येक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही

मात्र आर्थिक हितसंबंधामुळे या विट भट्ट्या सुरू असल्याच वसमत च्या नागरिकातून बोलल जातय

पण वसमत शहरातील कवठा रोड परिसरात असलेल्या सर्वच वीटभट्ट्या या अनधिकृत असल्याची माहिती जनता माहिती अधिकार समितीच्या अध्यक्षा वैशाली हिंगोले यांना त्यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकाराखाली वसमत तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे




आणि याच वसमत शहरातल्या अनधिकृत विट भट्ट्या उठवण्यासाठी वैशाली हिंगोळे या आमरण उपोषणाला वसमत तहसील कार्यालयासमोर बसल्यात

त्यामुळे वसमत तहसील प्रशासन आता तरी ॲक्शन मूडमध्ये येऊन कवठा रोडवरील वसमत शहरात येण्यासाठी मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या अनाधिकृत वीटभट्ट्या उठून वसमतच्या नागरिकांना रोगाच्या खाईत जाण्यापासून वाचणार का ? आणि पर्यावरणाचा नाश थांबवणार का ? हे मोठे दोन प्रश्न आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad