Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे फलटण तालुक्यातील सर्व सोसायट्यांमध्ये आमुलाग्र बदल

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे फलटण तालुक्यातील सर्व सोसायट्यांमध्ये आमुलाग्र बदल होऊन शेतकरी सभासद संख्येत लक्षणीय वाढ होणार : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख




फलटण प्रतिनिधी
कार्यक्षेत्रातील पात्र खातेदारांना प्राधान्यक्रमाने सभासद करुन घेण्यात यावे व मयत सभासदांचे वारसांना सभासद करुन संस्थेच्या उपविधीतील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तसेच ही कार्यवाही 30 जुन पुर्वी करुन संस्था निहाय अहवाल या कार्यालयास सादर करावा, तसेच कार्यक्षेत्रातील सर्व पात्र खातेदारांना 100 टक्के सभासद करुन घेण्यात यावे. मात्र असे करताना एकही अपात्र खातेदार संस्थेचा सभासद होणार नाही याची दक्षता फलटण तालुक्यातील सर्व संस्थांनी घ्यावी असे आदेश सहाय्यक निबंधक सुनिल धायगुडे यांनी तालुक्यातील सर्व चेअरमन व सचिव यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत. सदरचे लेखी पत्र 13 जुन 2022 रोजी आपल्या हातात मिळाले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.




फेब्रुवारी 2022 मध्ये झणझणे सासवड गावातील सासवड ग्राम विकास सोसायटीची निवडणूक प्रथमच शिवसेनेच्या माध्यमातून लढलो. त्यावेळी सभासद निवडताना दुजाभाव, वारस नोंदी न करणे, कर्ज वाटप करताना दुजाभाव, संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील सभासदांना नियमबाह्य पद्धतीने संस्थेत सामावून घेणे, असे बहुतांश मुद्दे सभासदांच्या व शेतक-यांच्या भेटीतुन समोर आले की ज्यामध्ये बहुतांश प्रमाणात त्रुटी आहेत. मग त्यावेळी माहिती घेतली असता संपुर्ण फलटण तालुक्यातील सर्वच विकास सोसायट्यांमध्ये सत्ताधारी गटाकडून तोंडं बघुन राजकारण केले जात असल्याचा प्रत्यय आला. याची चौकशी जरी लावली तरीदेखील, प्रत्येक सोसायटीमधील सभासदांच्या नगण्य संख्येवरून हे पुर्णपणे लक्षात येईल की पात्र असताना देखील शेतकरी त्या त्या गावातील त्या त्या सोसायटीचे सभासद का होऊ शकले नाहीत. सोसायटीचा पात्र सभासद म्हणजे काय ? याचे उत्तर म्हणजे फक्त 10 गुंठे जमीनीचा सातबारा त्या सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील त्या व्यक्तीच्या नावावर असणे आवश्यक आहे. अशा सर्व जमीनधारकांना आता त्या त्या सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील सोसायटीचा सभासद होता येणार आहे. मात्र सोसायटीच्या कार्यक्षेत्राबाहेरील जमीनधारकास त्या सोसायटीचा सभासद होता येणार नाही हे मुद्दा नंबर एकनुसार स्पष्ट होत आहे. आता शेतक-यांना सभासद होण्यापासुन कोणीही अडवु शकत नाही असे फलटण तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सुनिल धायगुडे यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले असल्याची माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर फलटण तालुक्यातील सर्व सोसायटीमधील मयत सभासदांची संख्या खुप मोठी आहे. कित्येक वर्षे झाली पण मयत सभासदांच्या नावावरचे शेअर्स त्यांच्या वारसांच्या नावावर झालेले नाहीत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मयत सभासदांच्या वारसांना वारसा हक्काने सभासद करुन घेण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीचे वाटप जसे अपत्यांमध्ये समान विभागले जाते, त्याप्रमाणेच मयत सभासदांच्या शेअर्सची विभागणी त्यांच्या अपत्यांच्या नावावर होऊन त्यांना त्या त्या सोसायटीचे सभासद केले जाणार आहे. तसेच त्यांना संस्थेचे पुर्ण लाभ व सेवा देण्याचे आदेश फलटण तालुक्यातील सर्व चेअरमन व सचिव यांना सहाय्यक निबंधक सुनिल धायगुडे यांनी लेखी पत्राद्वारे दिले असल्याची माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

फलटण तालुक्यातील शेतक-यांचा व सर्व सोसायटीमधील सभासदांचा ऐतिहासिक विजय : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख

एकंदरीतच शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांच्या पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे फलटण तालुक्यातील शेतक-यांवर होत असलेला अन्याय दुर होऊन फलटण तालुक्यातील सर्व शेतक-यांचा व सभासदांचा हा प्रचंड मोठा विजय झाला आहे. तसेच फलटण तालुक्यातील कोणत्याही संस्थेने पात्र असताना सभासद करुन घेतले नाही, कर्ज वाटप केले नाही, कार्यक्षेत्रा बाहेरील अपात्र व्यक्तीस सभासद करुन घेतले, वारस नोंदीप्रमाणे सभासद करुन घेतले नाही वा आणखी काही समस्या असल्यास शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचा संपर्क क्रमांक 8600138961 व 7774096430 याप्रमाणे आहे. फलटण तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालय फलटण येथे प्रदिप झणझणे यांचेशी थेट संपर्क साधावा. आपणास न्याय 100 टक्के मिळणार यात काही शंका नाही. सहाय्यक निबंधक सुनिल धायगुडे यांचे फलटण तालुक्यातील शेतक-यांच्यावतीने प्रदिप झणझणे यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News