मुळीकवाडी येथील चोरीला गेलेला जामदार डिपी शिवसेनेच्या प्रयत्नातुन सुरु : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख
फलटण तालुक्यातील मुळीकवाडी हद्दीतील जामदार डिपी मागील दहा दिवसापासून चोरीला गेला असल्याने शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद असुन शेतपीके अडचणीत असल्याची तक्रार शेतक-यांनी 15 जुन 2022 रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात समक्ष भेट देऊन केली होती. तेव्हा महावितरणकडे पाठपुरावा केला असता सदर डिपी चोरीला गेला असल्याची वीज महावितरणकडुन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे, परंतु काही शोध लागला नसल्याचे महावितरणचे अधिकारी इराबत्ती यांनी माहिती दिली असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
डिपी नादुरुस्त होवो अथवा चोरीला गेला तरी दोन दिवसाच्या आत डिपी बसवुन देणे वीज महावितरण कार्यालयास बंधनकारक आहे. फलटण वीज महावितरण विभागीय कार्यालयात शेतक-यांसह भेट देऊन सदर डिपी तात्काळ बसवण्यात यावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आक्रमक आंदोलन हाती घेण्याचा इशारा देण्यात आला होता. आज 17 जुन 2022 रोजी शिवसेनेच्या सलगच्या पाठपुराव्यामुळे जामदार डिपी आज बसवण्यात आला. मुळीकवाडी येथील शेतक-यांनी शिवसेनेचे व शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी शेतकरी अत्यंत आनंदी व त्यांच्या चेह-यावर समाधान दिसत होते.
फलटण तालुक्यात शिवसेनेच्या कामाचा सातत्याने झंझावात सुरु आहे. फलटण तालुक्यात शिवसेनेचा ना कोणी आमदार, ना खासदार, ना कोणी लोकप्रतिनिधी. परंतु फलटण तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यात शिवसेना आघाडीवर दिसत आहे.