Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे श्री वाघेश्वर पतसंस्थेवर गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु : प्रदिप झणझणे, शिवसेना

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे श्री वाघेश्वर पतसंस्थेवर गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख




श्री वाघेश्वर पतसंस्थेची सहाय्यक निबंधक फलटण यांनी नोंदणी रद्द केल्यानंतरही संस्थेने बेहिशोबी रक्कम ठेवीच्या स्वरुपात स्विकारुन ठेवीदारांची बेहिशोबी फसवणूक केली असल्याचे गंभीर प्रकरण फलटण तालुक्यात उघडकीस आले आहे. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर श्री वाघेश्वर पतसंस्थेवर MPID अॅक्टखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी व ठेवीदारांच्यावतीने करण्यात आली होती. त्या मागणीची गंभीर दखल घेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अधिकारी धन्यकुमार गोडसे व पोलीस उपनिरिक्षक सागर अरगडे यांचेशी सदर विषयावर झालेल्या चर्चेनंतर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडुन श्री वाघेश्वर पतसंस्थेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.


पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनानुसार आज श्री वाघेश्वर पतसंस्थेकडुन फसवणूक झालेल्या जवळपास पंधरा ते वीस ठेवीदारांचे जबाब पोलीस उपनिरिक्षक सागर अरगडे यांनी नोंदवून घेतले आहेत. शिवसेना जनसंपर्क कार्यालयात तक्रार घेऊन आलेल्या ठेवीदारांची सुरुवातीची संख्या पाच होती, ती संख्या आज वीसच्या आसपास गेली आहे. अजुन जबाब नोंदविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे एकुण किती ठेवीदारांची व एकुण किती रकमेची फसवणूक झालेली आहे हा आकडा बेहिशोबीच आहे. उद्याही अजुन येणा-या ठेवीदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या एकुण रकमेचा इतक्यात अंदाज लावणे निरर्थक ठरणार आहे. काही कालावधीनंतर व तपासाअंती सत्य निश्चितपणे बाहेर येईल. कष्ट करुन, घाम गाळुन सदर संस्थेकडे ठेवलेल्या रकमा ठेवीदारांना मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी ठासुन सांगितले.


श्री वाघेश्वर पतसंस्थेकडुन ठेवी परत न मिळालेल्या ठेवीदारांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व फलटण तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन फलटण तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, फलटण उपतालुका प्रमुख शिवाजी कोठावळे व अभिजीत कदम, ग्राहक सरंक्षण कक्षाचे माजी सातारा उपजिल्हा प्रमुख मनोज गोसावी, विभाग प्रमुख किसन यादव, महेंद्र घाडगे व तुषार वाडकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे उप शहरप्रमुख भारतशेठ लोहाना, वाठार निंबाळकर गावचे उपविभाग प्रमुख अभिजीत भोसले व शाखा प्रमुख मयुर निंबाळकर, सुरवडीचे शाखाप्रमुख दत्तात्रय मदने, सोमंथळीचे शाखाप्रमुख शिवाजी सोडमिसे, आदी शिवसैनिक व ठेवीदार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News