Type Here to Get Search Results !

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत , स्वागताची जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत , स्वागताची जय्यत तयारी




पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत . देहूतील श्रीसंत तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे . तर मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे . संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत .


असा असणार पंतप्रधानांचा कार्यक्रम

20 जूनला तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून , त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे . संत तुकाराम पगडीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात येणार आहे . पंतप्रधान मोदी यांचं दुपारी 1.10 वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल . त्यानंतर विमानतळावरून देहूकडे ते प्रयाण करतील . 1 वाजून 45 मिनिटांनी मंदिर समिती जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर संस्था परिसरात ते दाखल होतील . या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती , शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होईल . संत तुकोबारायांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत . त्यासाठी येथे भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे .


कडेकोट पोलीस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यासाठीच्या पार्श्वभूमवीर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . देहूत बंदोबस्तासाठी 10 पोलीस उपायुक्त , 20 सहायक पोलीस आयुक्त , 25 पोलिस निरीक्षक , 295 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 2 हजार 270 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News