झाडी डोंगार हाटील पलीकडे ...
अस्सल ग्रामीण बाज असलेली मराठी अनेक दिवसांनि ऐकायला मिळली असेल महाराष्ट्र ला.बापू आहेतच अस्सल ग्रामीण वक्ते.. पण या पलकिडे ते आहेत प्रवचन कार... कायदे पंडित..
तालुका काय जिल्ह्यात ते उत्तम अस्सल राजकारणी वक्ते आहेत..अस्सल पाटील रुबाब आणि बाज काय असतो ते बापू कडून शिकावं...जनमानसात नेता मिसळतो तेंव्हा तो जी आपल्या प्रांताची भाषा बोलतो यात भाषेची आपुलकी असते..
बापू भविष्यात महाराष्ट्र गाजवतील अशी वकतृत्व कला आहे ..राजकीय असो ग्रामीण असो सगळ्या गोष्टी ना ग्रामीण असलेतेचा touch असावा अन तो बापू नि जपला आहे...
ट्रोल ,बंडखोरी ,राजकारण बाजूला ठेवूया पण बापू 40 वर्ष संघर्ष करत होते पराभव सोसत होते. ना संस्था ना कारखाना दारी वक्तृत्व आणि जण संपर्क हेच जनते पर्यन्त पोहचयाच साधन .बापू ना भेटायचं असेल तर कोणाची शिफारस लागत नसे डायरेक्ट बापू ना पारावर भेटतो तस लोक भेटतात आणि प्रश्न मांडतात...
विदर्भ, मराठा वाडा ,वा कोल्हापुरी ,कोकणी माणस भाषेवरून ओळखली जातात त्यामुळे आपल्या प्रांताची भाषा आपण जपली पाहिजे वाढवली पाहिजे..
ग्रामीण मराठी भाषा जपली पाहिजे सांगोला च्या भूमीची अस्सल गावरान भाषा बापू सारख व्यक्ती ची गरज आहे जी भाषा टिकेल आणि जपावी लागेल...
बाकी राजकारणी आणि ग्रामीण बाज महाराष्ट्र च्या प्रत्येक घरापर्यंत पोहचला
ब्रँड डायलॉग ...झाडी ,डोंगार, हाटील ...
आमदार शहाजीबापू पाटील