Type Here to Get Search Results !

1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली

 1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी.




 शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला  26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या.

या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता. 

1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले.

आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ?

लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य.

आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News