Type Here to Get Search Results !

Madha | तालुक्यातील अंजनगाव येथील श्री खेलोबा देवाच्या यात्रेस प्रारंभ

माढा तालुक्यातील अंजनगाव येथील श्री खेलोबा देवाच्या यात्रेस प्रारंभ




माढा प्रतिनिधि : श्री खेलोबा देवाच्या नावाने चांगभलं,विठ्ठल बिरुदेवाच्या नावाने चांगभलं अशा जयघोषात व भंडारा,खोबऱ्याच्या उधळणात श्री खेलोबा देवाच्या छबिन्याने माढा तालुक्यातील अंजनगाव येथील श्री खेलोबा देवाच्या यात्रेस प्रारंभ झाला.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेला कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडला होता, परंतु या वर्षी यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

माढा तालुक्यातील कुर्डुवाडी - सोलापूर महामार्गांवर वसलेल्या अंजनगाव येथे श्री खेलोबा देवाचे मंदिर आहे.पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेची सुरुवात श्री खेलोबा देवाच्या छबिन्याने झाली. या छबिन्याचे विशेष म्हणजे देवाची परज.

यावेळी श्री खेलोबा म्हणजेच देवाचे मानकरी खेलोबा वाघमोडे आपल्या पोटावर तलवारीने वार करतात.
ही परज पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली असते.याचबरोबर धनगरी नृत्य व सोगांच्या गाड्या यांनी भाविक भारवून गेले होते.

यात्रा काळात अनेक करमणूकीच्या कार्यक्रमाचे आयोजन गावातील मित्रा मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच जंगी कुश्त्याचे मैदान यात्रेनिमित भरवण्यात येणार आहे.

या यात्रेनिमित्त भाविकांना महाप्रसाद वाटप केले जात आहे.या यात्रेची सांगता केळी बदलून म्हणजेच पुजारी बदलून केळी जाते.सर्व जाती,धर्मातील नागरिक एकोप्याने यात्रा उत्साहात साजरी करतात हे अंजनगावचे अखंडित वैशिष्ट्य राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad