बिटरगाव बु, चे हायमास पोल बनले शोभेचे टावर,
बिटरगाव येथील हायमास पोल लाईट जवळपास सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अंधारात जाणे-येणे करावे लागत आहे, गावामध्ये अनेक ठिकाणी हायमास पोल व एल.ई.डी. लाईट असूनही बिटरगाव येथे अंधार कायम आहे,
बिटरगाव येथे रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे असल्यामुळे वयोवृद्ध महिला, पुरुष, लहान मुले कामानिमित्य दवाखाना, किराणा सामान, अथवा शेती विषयक मजूर मजुरीसाठी लावण्याकरिता जात असताना ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे, एकूण हायमास पोल 05 आहेत व पोल मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन आणि 14 वा वित्त आयोग निधीतून लावण्यात आले होते,
अंदाजे खर्च 7 लाख रुपये करण्यात आला, परंतु ग्रामपंचायत बिटरगाव बु यांनी या निधीचा गैरवापर करून निकृष्ट दर्जाचे सामान लावून हे शोभेचे टावर उभारण्यात आले होते, कंत्राटदार व ग्रामपंचायतच्या मिली भगतमुळे गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे,
ग्रामपंचायतला अनेक निधी येऊन सुद्धा गावामध्ये अंधार असल्यामुळे ग्रामस्थांची नाराजी आहे, विज्ञान यूगामध्ये बिटरगाव सारखे गाव कुठेच पाहायला मिळणार नाही, खोटेच पण रेटून बोलणारे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असल्यामुळे सर्वसामान्य गरीब जनता त्यांच्या विरोधात बोलू पण शकत नाही,
आपल्या गावाचा विकास व गावातील सर्व कामे सुरळीत कधी होतील हा प्रश्न गावामध्ये गल्ली बोळी मध्ये ऐकण्यास मिळत आहे.
प्रतिनिधी,निगंनूर मैनोदिन सौदागर