Type Here to Get Search Results !

नांदेड | दिवसाढवळ्या थरार !माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरी बंदूक घेऊन हल्लेखोराचा प्रवेश; कुक वर हल्ला तर सावंतावर रोखली बंदूक

नांदेड दिवसाढवळ्या थरार !माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या घरी बंदूक घेऊन हल्लेखोराचा प्रवेश; कुक वर हल्ला तर सावंतावर रोखली बंदूक





सत्यपाल सावंत या कार्यकर्त्यामुळे मोठा अनर्थ टळला :- नांदेड प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/ शहरातील अति महत्त्वाचे नेते असलेल्या शिवाजीनगर भागातील माजी राज्यमंत्री सावंत यांच्या 'आई' या निवासस्थानी एक बंदुकधारी घुसला. त्याने माझे काम करा अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या नोकराला मारून टाकतो, अशी धमकी देत बंदूक थेट डी. पी. सावंत यांच्यावर रोखली. भर दिवसा हा थरार घडल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.


प्रसंगावधान राखून घरातील नौकराने हल्लेखोराला स्वतःची जीवाची पर्वा स्वतः जखमी झाला. त्यानंतर पळून गेल्यानंतर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सत्यपाल सावंत यांनी पाठलाग करून काब्दे यांच्या हॉस्पिटलजवळून पळत असताना पकडले. हल्लेखोर सध्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून बीड जिल्ह्याचा तो रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.


शहरातील शिवाजीनगर भाग हा हेवी वेट नेते असलेले पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर व माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांचेही निवासस्थान आहे. आज दि.३० मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास डी. पी. सावंत यांना भेटण्यासाठी म्हणून बीड जिल्ह्यातून माने नावाचा युवक त्याच्या वडीलाचे आणि गावातील लोकांचा शेतीविषयक वाद आहे. तो वाद मिटवण्यासाठी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आला होता मात्र, ना.चव्हाण घरी नसल्याची माहिती मिळाल्यानंतर तो समोरच असलेल्या डी. पी. सावंत यांच्या घरात शिरला तेंव्हा यावेळी तो माझा मतदारसंघ नाही, मी काही करू शकत नाही. तू आठ दिवसानंतर ये साहेबांना बोलू असे सांगून त्याला माघारी पाठविले.


मात्र, पुन्हा तो युवक दुपारी एक वाजता घरी आला. यावेळी सावंत यांचे सेवक सुभाष पवार यांना साहेब कुठे आहे विचारले असता त्यांनी सांगितले की साहेब यशवंत महाविद्यालया शेजारच्या आयटीएएमला आहेत असे सांगितले. त्यानंतर तो युवक तिथे गेल्याने त्याला सावंत हे घरी परतल्याचे कळाल्याने पुन्हा डी. पी.सावंत यांच्या घरी तो परत येऊन चुकीची माहिती देता का? तेंव्हापासून मी फिरतोय असे बोलत सुभाष पवार यांच्यासोबत त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी सुभाष पवार यांनी पुन्हा डी. पी. सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरण तांदळे यांच्याशी संपर्क साधला असता डी. पी. सावंत हे घरी गेल्याची माहिती दिली. यावेळी पुन्हा दरवाजा बंद केला.


 त्यानंतर सदर युवकाने पुन्हा दरवाजा ठोठावला आणि 'मला तुमच्याशी बोलायचे आहे, मला न्याय द्या', असे म्हणून तो गोंधळ घालू लागला. सावंत यांनी त्याची समजूत काढून त्यास घराबाहेर काढले. परंतु, पुन्हा तो घराच्या पाठीमागील दरवाजाने स्वयंपाकगृहात व सुभाष पवार यांच्याशी शाब्दिक वाद घालून झटपट करून बंदूक लावली. दरम्यान, आतून आवाज येत असल्याने डी. पी.सावंत किचन मध्ये गेले. यावेळी त्या माथेफिरुने पवार यांना सोडले आणि डी. पी. सावंत यांच्यावरच बंदूक रोखून धरली. यावेळी त्याने सुभाष पवार यांच्यावर बंदुकीने डोक्यावर वार करून जखमी करत पळ काढला. तेंव्हा डी. पी.सावंत यांनी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सत्यपाल सावंत त्याठिकाणी आले असता त्यांना तात्काळ माहिती देऊन हल्लेखोर ज्या दिशेने पळाला त्या बाबत सांगितले. 


दरम्यान, सत्यपाल यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याचा पाठलाग करून महावीर सोसायटीतील डॉ. काब्दे हॉस्पिटल जवळ पकडून त्यास शिवाजीनगर पोलीस स्थानकात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.तर जखमी सुभाष पवार यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नेमका हा हल्लेखोर कोण आहे? त्याने हे पाऊल का उचलले? तो कुठल्या कामाच्या संदर्भात मंत्री अशोक चव्हाण व डी.पी.सावंत यांच्याकडे खेटे मारत होता. या प्रकरणाची कसून चौकशी शिवाजीनगर पोलीस स्थानकाचे निरीक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या थरारक घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


 या प्रकरणाची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी शिवाजीनगर भागातील डी.पी.सावंत यांच्या घराकडे धाव घेतली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad