बाळासाहेब निकम यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार समारंभ
श्रीपुर प्रतिनिधी
श्रीपुर ता माळशिरस येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाई नगर माढा कारखान्याचे माळशिरस गटाचे अॅग्री ओव्हरसियर बाळासो बाबासो निकम यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माळशिरस गटाचे नुतून अॅग्री ओव्हरसियर प्रदिप राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.
बाळासाहेब निकम यांनी १९८९ते २००९ पर्यत पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर शेती विभागात त्यांनी प्रामाणिक काम केले होते. त्यानंतर त्यांनी २००९ते ३१ मे २०२२ पर्यंत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि गंगामाईनगर माढा या कारखान्यामध्ये माळशिरस गटातामध्ये अॅग्री ओव्हरसियर म्हणून एकनिष्ठ व प्रामाणिक पणे काम केले त्यामुळेच आज त्यांच्या सेवानिवृत्त सत्कार सुभारंभा निमित्ताने अनेक सभासद शेतकऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्य निरोगी सुख समृद्धि जावे अश्या शुभेच्छांचा दिल्या.
यावेळी माळशिरस गटाचे नुतून अॅग्री ओव्हरसियर प्रदीप राजमाने, चंद्रकांत सावंत, निशांत शेळके, बबन नवगिरे, अतुल कचरे, चैतन्य चव्हाण, विकास खटके, वैभव शेळके, नितीन शेळके, हर्षवर्धन शेळके, अमर भाग्यवंत, दत्तात्रय कोळी, आनंद दधांडे यांच्या सह महाळुंग श्रीपुर परिसरातील गावातील शेतकरी सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.