कोरोना नंतर शेती क्षेत्रा मधील संधी - उत्कर्ष माने विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ.
कोरोना महामारी काळात शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसे पाहिले तर कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असते, जसे की मागच्या सिझनला महापूरामुळे. त्यात एक सर्वात मोठा मुद्दा म्हणजे शेत मालाला न मिळणारी आधारभूत किंमत(MSP). परंतु या कोरोना महामारी काळात शेती क्षेत्रामध्ये असे परिवर्तन व्हायला लागले आहे की ते या आधी कधीच झाले नव्हते. ते म्हणजे शेतकरी (उत्पादक) ते ग्राहक थेट विक्री. काही शेतकऱ्यांनी जाग्यावरून शेतमाल विकला तो ही चांगल्या दराने. यावरून ग्रामीण भागात देखील किती potential आहे ते समजते. लॉकडाऊन मुळे शहरी भागातील लोकांना फळे भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. आणि या साठी पुढे आल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ज्यांनी थेट शेतकरी ते ग्राहक विक्री सुरू केली. सहयाद्री सारख्या मोठ्या कंपनीने तर एका महिन्यामध्ये 5 कोटीची शेतकरी ते ग्राहक विक्रमी विक्री केली. ज्या मुळे शहरी लोकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला घरपोच मिळाला. त्याच बरोबर व्यापारी साखळी कमी झाल्यामुळे शेतमालाला चांगला भाव देखील भेटला.
कोरोनामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुद्धा.
या वरून एक गोष्ट लक्षात येते की शेतमालाची मूल्य साखळी तयार होणे किती गरजेचे आहे. पिकांचे जास्त उत्पादन पाहता ग्राहकवर्ग सुद्धा जास्त आहे. त्याप्रमाणे रिटेल चैन तयार करून उत्पादक ते ग्राहक माल पुरवठा करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर तंत्रज्ञानाचा जास्त वापर करून शेतकरी ते ग्राहक व्यवस्थित मूल्य साखळी निर्माण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे शेतकरी आणि ग्राहक ऑर्गनाइज करण्यास मदत होईल.
यासाठी कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. या कोरोना काळात ज्या वेगाने रिटेल चैन तयार झाल्या त्या वेगाने पुढे ही चालू राहिल्या तर शेतकऱ्यांचे नक्कीच चांगले दिवस येतील. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकांची व्यवस्थित माहिती घेऊन ब्रँडच्या मागे न लागता कमी उत्पादन खर्चा मध्ये उत्पादन घ्यावे.
उत्कर्ष माने
विभागीय व्यवस्थापक,
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ.