फलटण प्रतिनिधी
फलटण येथील लाॅ काॅलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी ग्रामीण भागातील एसटी सेवा मागील चार वर्षांपासून बंद असुन विद्यार्थ्यांसाठी प्रवासी वाहनाची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार फलटण तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालयात केली होती. कुसुर, रावडी खु.||, रावडी बुद्रुक.||, मुरुम, खामगाव, साखरवाडी, होळ इत्यादी ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. त्यांनी एसटीच्या दोन फे-या सकाळ व दुपारच्या सत्रात चालु करावी अशी मागणी केली होती असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
आम्ही सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी असुन आम्हाला शिक्षणासाठी शहरात यावे लागते. पण मागील चार वर्षांपासून वरील भागातील एसटी सेवा बंद असल्यामुळे आमची शैक्षणिक अडचण होत आहे. तसेच शिक्षणात खंड पडत आहे. तरी वरील भागातील एसटी सेवा चालु व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे फलटण येथील लाॅ काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी लेखी मागणी केली होती.
त्यानंतर लगेचच फलटण एसटी डेपोचे मॅनेजर राहुल नाईक यांची सर्व विद्यार्थ्यांसह शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी समक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांची समस्या व मागणी त्यांना सांगितली. तसेच सदर समस्या सोडवण्यासाठी एसटीच्या दोन फे-या तात्काळ चालु करण्याची मागणी केली. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन एसटी डेपोचे मॅनेजर राहुल नाईक यांनी तात्काळ दुस-या दिवसापासुनच एसटीच्या दोन फे-या चालु करण्याचे संबंधितांना आदेश दिले. त्याप्रमाणे आज दिनांक 19 मे 2022 पासुन सकाळी 6.30 वाजता कुसुर ते साखरवाडी मार्गे फलटण व दुपारी 2.30 वाजता फलटण ते साखरवाडी मार्गे कुसुर अशा एसटीच्या दोन फे-या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरीता येण्या-जाण्यासाठी चालु केल्या आहेत.
कुसुर, रावडी खु.||, रावडी बुद्रुक.||, मुरुम, खामगाव, साखरवाडी, होळ या गावांमधील विद्यार्थ्यांसह सर्व ग्रामस्थांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व फलटण एसटी डेपोचे मॅनेजर राहुल नाईक यांनी केले आहे. शिवसेनेच्या कार्यतत्परतेबाबत विद्यार्थ्यी, पालक व ग्रामस्थांमधुन आनंद, समाधान व शुभेच्छा व्यक्त होत आहेत.