प्रतिनिधी निगंनूर मैनोदिन सौदागर ता उमरखेड जि यवतमाळ
, जेमतेम 5000 हजार लोकसंख्येची वस्ती म्हणजे उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बुद्रुक हे एक गाव, या गावात अनेक जाती धर्म पंथाचे लोक अतिशय आनंदाणे निवास करतात, पण या गावातील व्यक्ती / स्त्री चे निधन होते तेव्हा मात्र मोठी पंचाईत होते, कारण संपूर्ण गावाची स्मशानभूमी एकच आणि या स्मशानभूमीची दुरआवस्था अशी आहे की, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, स्वच्छता नाही अंतिम वेळी सर्व गावकर्यांची नाराजी होते,
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये स्मशानभूमी पर्यंत स्वर्ग रथ जात नाही, किंवा चार माणसाच्या खांद्यावरील डोली सुद्धा मोठ्या मुश्कीलीने न्यावे लागत असते, कारण चिखलाने व पावसाने डब्ब रस्ता असल्यामुळे बिटरगाव ग्रामस्थांना चिखला पाण्याचा सामना करुन अंतिम संस्कार पार पडावा लागत असते, या कारणाने संपूर्ण नागरिकांमध्ये नाराजगी चे वातावरण दिसून येत आहे,
बिटरगाव बुद्रुक ग्रामपंचायत नि दह न शेड निर्मितीसाठी अनेक स्कीम फंडाच्या माध्यमातून स्मशानभूमीचे सुशोभीकरण पाणी लाईन स्वच्छ सुरळीत रस्ता करावा अशी मागणी संपूर्ण गाव वासियांची आहे , नाहीतर आम्ही लोकवर्गणी करून स्मशानभूमीचे संपूर्ण काम करू असा इशारा सुद्धा ग्रामपंचायत बिटरगाव यांना दिला आहे,