मोदी सरकारने आपला शब्द पाळला 'ना खाऊंगा ना खाने दुँगा' महागाईने गाठला नवा उच्चांक
वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराचे चित्र लोकांपुढे मांडून २०१४ साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 'ना खाऊंगा, ना खाने दुँगा' अशी घोषणा केली होती. याच वाक्याला केंद्र सरकारने सत्यात उतरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील महागाईचा उच्चांक गाठला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) हा एप्रिल २०२२ या महिन्यात ७.७९ टक्क्यांवर पोहचला आहे. २०२१ च्या एप्रिल महिन्यात सीपीआय हा ४.२३ टक्के होता तर मार्च २०२२ मध्ये ६.९५ टक्के होता.
सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने सामान्य जनतेला केवळ धक्केच दिले आहेत. नोटबंदी, बेरोजगारी, गॅस दरवाढ आणि आता महागाईचा हा चढता आलेख यातून मोदी सरकार देशाला श्रीलंकेच्या वाटेवर घेऊन जाणार की काय अशी भावना सामान्य माणसाच्या मनात येत आहे.