फुलसावंगी येथील बस स्थानक वरील सिमेंट रोड चे काम होऊन एक वर्ष झाले परंतु या एकाच वर्षात ह्या सिमेंट रस्त्याला खड्डे पडल्याने त्याचे दुरुस्ती चे काम पुसद येथील ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. परंतु हे काम करताना रस्त्या वर होणारी दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्या साठी मोठे मोठे दगड ठेवून रस्ता वळवुन दिला. रस्ता बनवताना रेडियम पेंटचे बोर्ड लावणे बंधनकारक असताना या बेजबाबदार ठेकेदाराकडून फक्त रस्त्यावर मोठे मोठे दगड ठेवून रस्ता वळवल्याने रात्रीला होणाऱ्या रस्त्यावरील वाहतूकदारांना हे दगड जवळ जायेपर्यंत दिसत नसल्याने आज अंदाजे ८:३० वाजता च्या सुमारास १० - १५ मिनिटांच्या फरकाने या ठेवलेल्या दगडांना तीन वेगवेगळ्या दुचाकीचे धडकून अपघात झाले.
यामध्ये दत्ता आवळे रा.हिंगणी वर ३० वर्ष हे पत्नी व दोन मुलांना घेऊन आपल्या गावाकडे जात असताना या ठेवलेल्या दगडाला दुचाकीची धडक लागून गंभीर अपघात झाला यामध्ये त्यांचा मुलगा कृष्णा दत्ता आवळे वय वर्ष ७ याला गंभीर इजा होऊन त्याचा पाय मोडल्याचे (निकामी) प्रथमदर्शी बघुन येथील खाजगी डॉक्टरने सांगितले दुसरा अपघात हा दादाराव खंदारे वय 32 वर्ष रा. चिल्ली (इ) हे आपल्या पत्नीला घेऊन जात असताना यांचाही अपघात त्यात ठेवलेल्या दगडाला झाल्याने त्यांच्या पत्नीला गंभीर इजा झाली आहे. तर तिसरा अपघात हा विष्णू सुरेश जाधव राहणार फुलसावंगी वय 22 वर्ष याचा झाला याला सुदैवाने गंभीर इजा झाली नाही.
एकाच दिवशी दहा ते पंधरा मिनिटांच्या फरकाने तीन-तीन दुचाकीचे अपघात बेजबाबदार पणे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने झाल्यामुळे स्थानिक नागरिकातून ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
माझ संबंधित ठेकेदाराशी बोलन झाल,त्याच्या म्हणण्यानुसार बोर्ड लावला होता.तो कोणी तरी पाडला होता. तरी संबंधित काम जो पर्यंत पुर्ण होणार नाही तो पर्यंत दोन्ही बाजुंनी बोर्ड लावण्याच्या सुचना दिल्या आहेत.
मेहुल भदर्गे
कनिष्ठ अभियंता सा.बा. विभाग महागाव
उमरखेड वाहतूक शाखा फक्त वसूलीसाठीच का...?
फुलसावंगी येथे कोट्यावधी रूपये खर्च करून दुपदरी सिमेंट रस्त्याची निर्मिती केली. परंतु यावर केवळ एकाच बाजूने सध्या वाहतूक सुरू आहे.तर दुसऱ्या बाजूने खाजगी गाड्या मोठ्या प्रमाणात लावलेल्या असतात. त्यामुळे वाहतूकीस मोठा आडथळा निर्माण होत आहे. वास्तविक पाहता वाहतुक शाखेचे काम असते की,वाहतुक सुरळीत करुन वाहतुक दारांना कोणताही त्रास होऊ नये ही जवाबदारी असतांना ही उमरखेड वाहतुक शाखाही आपले कर्तव्य योग्य बजावत नसल्याने वाहतुक करणाऱ्या प्रवाशांना नाहक याचा त्रास सहन करावा लागत आहे.
परंतु उमरखेड वाहतूक शाखाचे कर्मचारी मात्र गुरूवारी बाजारच्या दिवशी गावाच्या बाहेर उभे राहून सर्वसामान्यांकडून आवाच्या सवा वसूली करण्यातच धन्यता मानतांना दिसून येत आहेत.त्यांना गावातील एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेली वाहतुकीची कोंडी दिसत नाही का ?की उमरखेड वाहतूक शाखाची निर्मिती ही फक्त वसूलीसाठीच करण्यात आली का? असा सवाल फुलसावंगी येथील सर्व सामान्य जनतेला पडला आहे
फुलसावंगीतील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी दुपदरी रस्त्याची निर्मिती करण्यात आली.परंतु रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट स्वरूपाचे करण्यात आले आहेत.रस्त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट झाला आहे.ठेकेदाराचा हलगर्जी पणा लोकांच्या जिवावर बेतत आहे.अश्या ठेकेदारावर कार्यवाही करुण त्या गरीब कुंटूबातील व्यक्तीना आर्थिक मदत देण्यात यावी.तसेच वाहतूक विभागाणे विशेष लक्ष घालून वाहतूक सुरळीत करून द्यावी.जर हिच परिस्थिती जैसे थे राहिल्यास भविष्यात अपघाताच्या घटनात वाढ होऊन एखाद्या व्यक्तीला आपला जिव गमवावा लागु शकतो त्यामुळे लवकरात लवकर हि समस्या निकाली काढावी.
कुणाल नाईक,ग्रा.प.सदस्य फुलसावंगी.
प्रतिनिधी :- संजय जाधव