Type Here to Get Search Results !

बंदुकीचा दिवसाढवळ्या धाक दाखवत मायक्रो फायन्ससच्या कर्मचऱ्यास लुटले - १ लाख ६५ हजाराचा दरोडा

बंदुकीचा दिवसाढवळ्या धाक दाखवत मायक्रो फायन्ससच्या कर्मचऱ्यास लुटले - १ लाख ६५ हजाराचा दरोडा





रोख रक्कम सह बंदुक आरोपी कडुन जप्त 

महागाव उमरखेड पोलीसांची कारवाई 

प्रतिनिधी महागाव :- संजय जाधव


महागाव तालुक्यात दिवसेदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने कायदा सुव्यव्सथेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाव तालुक्यात लुटमार,दरोडा, चोरी चे प्रमाण वाढत आहे. युवा वर्ग गुन्हेगारी कडे वळत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महागाव तालुक्यातुन मायक्रो फायनस ची वसुली करून उमरखेड कडे जात असतांना चुरमुरा गावालगत तिन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवुन १ लाख ६५ हजार रूपये लुटल्याची माहिती फीर्यादिने पोलीसांना देताच महागाव व उमरखेड पोलीसांनी तपासाचे सुत्र हालवताच अवघ्या काही तासात महागाव येथुन तिनही आरोपींना मुद्देमालासह अटक केली.


सविस्तर वृत्त असे की, महागाव येथुन बचत गटाच्या महिलांना मायक्रो फायनस कंपणीने कर्ज वाटप केले आहे. कर्जाची वसुली करून उमरखेड कडे जात असतांना आरोपींनी पाळत ठेऊन पाठलाग केला.


 अगोदर फुलसावगी येथे आरोपींनी दुचाकी क्र.एम एच २९ बि एल ७५२४ या नंबर प्लेट वर माती लावली ही बाब फुलसावगी येथील काही नागरिकांनी पाहीली असता त्यांना विचारण्या आले तेव्हा त्यांनी सागीतले की भावासोबत वाद झाले आहे. तेव्हा जाताना ओळखु येऊ नये म्हणून माती लावत असल्याचे सागुन येथुन निघुन गेले. काही वेळातच चुरमुरा येथे दरोडा टाकल्याची माहिती मीळताच फुलसावगी येथे कुणकुण सुरू झाली. पोलीसांनी आपले खबरी कामाला लावले असता ही बाब लक्षात आले असता. 


महागाव पोलीसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपीं शे. मोहम्मद शे. शफीउल्ला २६ वर्ष रा महागाव, महेश मनोहर राठोड रा करंजखेड, राहुल ज्ञानेश्वर राकडे रा करंजखेड यांना तहसील कार्यालय येथून ताब्यात घेतले. असता आरोपी राहुल राकडे यांच्या घरी रोख रक्कम सह गुन्हा त वापरलेली बंदुक, दुचाकी जप्त केली असुन अधिक तपासा करत आरोपींना उमरखेड येथे नेण्यात आले. 


ही कारवाई महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण, उमरखेड येथील पोलीस उपनिरिक्षक आमोल राठोड, फुलसावगी येथील बिट जमादार निलेश पेढांरकर, रायटर नारायण पवार, उमरखेड एस डीपी ओ कार्यालयात रूपेश चव्हाण, बालाजी मारकड आणि चालक विवेक पारडकर यांनी केली आहे. फुलसावंगी येथील बीट जमदार निलेश पेंढारकर व त्यांचे पोलीस सहकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad