Type Here to Get Search Results !

कळमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये, पिएम किसान ई-केवायसी, व MahaDBT शिबिरांचे आयोजन.

कळमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये, पिएम किसान ई-केवायसी, व MahaDBT शिबिरांचे आयोजन.






कळमेश्वर तालुका: कळमेश्वर तालुक्यातील लिंगा, उपरवाही, सोनेगाव,खैरी, मसेपठार, मडासावंगी,विविध ग्रामपंचायत मध्ये पिएम किसान ई-केवायसीव व महाडिबीटी शेतकरी बांधवांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले. विविध ग्रामपंचायत मध्ये *हक्कदर्शक कंपनी आणि जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन व कृषी विभाग कळमेश्वर* यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. शिबिरांर्तगत पिएम किसान ई-केवायसी, महाडिबीटी, बि-बियाणे,पेंशन योजना,आयुष्यमान भारत,सोबतच इतर योजना ज्यांना-ज्यांना लागू पडत आहेत त्यांनाही त्या-त्या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्यात आले.




ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजनांचा माहितीअभावी आणि कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याने या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. त्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिक हा शासकीय योजनापासून वंचित राहू नये यासाठी हे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सरपंच,सदस्य, कृषी अधिकारी, गुलाले सर, हक्कदर्शकचे प्रकल्प अधिकारी, संदीप कांबळे, सहकारी अंकुश गोटमारे, पोर्णिमा दहेनकर, शितल ताई, महेश,उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad