वसमत शहरातील अनेक भागात मोठया प्रमाणात देशी विदेशी दारूची खुलेआम विक्री चालु आहे. तरी उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष का अशी चर्चा शहरात होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात चोरी चुपके सुरु असलेली अवैध धंदे चालकावर कडक कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना दिल्या असल्याने काही ठाणेदा्रांकडून आपल्या ठाणे हद्दीत अवैध धंदे चालकांवर कार्यवाही करण्यात येत आहे. तरी आजही अनेक पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी विदेशी दारूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
वसमत शहरात ढाब्यावर टपरीवर खुलेआम अवैध देशी विदेशी दारूंची विक्री होत असल्याने. पोलिसांकडुन कार्यवाहीची मोहीम सुरु असली तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यावर काही कठोर कार्यवाही करतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
यामुळे युवापिढी मोठ्याप्रमाणात नशेच्या आहारी जात आहे. या अश्या नशिल्या पदार्थांना वेळीस आळा घालणे आवश्यक आहे.
प्रतिनिधी :- बालाजी पोले