Type Here to Get Search Results !

काम बोलतंय : गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा चालणार सौरउर्जेवर; मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) सभापती विधानपरिषद,महाराष्ट्र राज्य यांचा आदेश..

 काम बोलतंय : गिरवी प्रादेशिक पाणीपुरवठा चालणार सौरउर्जेवर; मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) सभापती विधानपरिषद,महाराष्ट्र राज्य यांचा आदेश..



 । फलटण । :- तालुक्याच्या पुर्व भागातील गावांना वरदान ठरलेली गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही आता सौरउर्जेवर चालवण्याचे आदेश विधानपरिषदेचे सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर(महाराज साहेब) यांनी दिलेले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या उर्जा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महाउर्जाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गिरवी नळ पाणीपुरवठा योजनेला भेट दिली व तातडीने पुढील कार्यवाही करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

  zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz     

 गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर कोळकी, दुधेबावी, झिरपवाडी, भाडळी बु.।।, भाडळी खु.।।, सोनवडी बु.।।, तिरकवाडी या गावांचा समावेश आहे. यामध्ये येणारे लाईटबिल हे सर्व गावे भरण्यास सक्षम आहेतच असे नाही. त्यामुळे गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व त्यावर असणारे जॅक वॉल व जलशुद्धीकरण प्रकल्प हा संपूर्णतः सौरऊर्जेवर सुरू करण्यात यावा, असे आदेश विधानपरिषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांनी दिलेले होते. त्यानुसार अधिकार्यांनी पाहणी करून लवकरच गिरवी नळ पाणीपुरवठा योजना त्यावर असणारे जॅक वॉल व जलशुद्धीकरण प्रकल्प हा संपूर्णतः सौरऊर्जेवर सुरू करणार असल्याची माहिती यावेळी अधिकार्यांनी दिली. 

            

गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही सौरऊर्जेवर चालण्यात यावी ही बाब सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांच्या निदर्शनास आणून दिली. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) यांच्या नेतृत्वाखाली व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व त्यावर अवलंबून असणारे जॅक वॉल व जलशुद्धीकरण प्रकल्प हे लवकरच सौरऊर्जेवर सुरू होतील अशी माहीती यावेळी मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मोहनराव डांगे यांनी यावेळी दिली.

           

 गिरवी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी महाउर्जाचे सोलापूर विभागाचे प्रकल्प अभियंता सनशील मिट्टा यांच्या पथकाने पाहणी केली. यावेळी तिरकवाडीचे उपसरपंच नानासाहेब काळुखे, जोतीराम नाळे, झिरपवाडीचे ग्रामसेवक नाळे, सोनवडीचे ग्रामसेवक बनकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

फलटण प्रतिनिधी विकास बेलदार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News