हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भिमराव भुसनर ,राष्ट्रवादी नेते अशोक दादा गायकवाड ,साजीद भाई सय्यद किरणजी साठे,सुरेश गंभीरे,जाकीर शेख,पिंटु एकतपुरे,यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅग्रेसचे युवा नेते भावी नगराध्यक्ष मा.राहुल ढेरे पाटील अकलूज यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटपाचा आयोजन करण्यात आले होते.
राहुल ढेरे पाटील अकलूज मध्ये सामाजिक बांधिलकी जपून सर्व सामान्य कुटुंबाला आधार देत गोरगरिबांना मदत करणे,अडीअडचणींच्या वेळी पाठीशी खंबीरपणे उभे राहणे,शासकीय योजने बद्दल सर्वांना माहिती सांगणे,नेहमीच सहकार्य करण्याची भुमिका ठेवणे,त्यामुळे अकलूज परिसरातील गोरगरिबांना चांगले नेतृत्व मिळाले आहे.
चांगले काम केले की जनता आशिर्वाद देत असते.हा निसर्गाचा नियम आहेच ना.कार्यक्रमाचे आयोजन हटकर समाज महासंघाचे अध्यक्ष भिमराव भुसनर पाटील यांनी केले होते.