राज्यात जून महिन्यापासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु होणार
गृह विभाग लवकरच गाठणार १५ हजार भरतीचे ध्येय - गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील
गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात जून महिन्यापासून पोलिस भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती दिली. गृह विभागाने आतापर्यंत साडेपाच हजार पोलिस भरती पूर्ण केली आहे.
तसेच सात हजारांच्या भरती प्रक्रियेला साधारणपणे १५ जूनपासून सुरुवात होईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. याशिवाय पोलिस विभागात स्टाफची असलेली कमतरता लक्षात घेऊन अधिकची १५ हजार पदे भरण्याची मागणी गृह विभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे.
यासाठी मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक आहे. यातून राज्यातील अनेक तरूण मुलांना पोलिस विभागात काम करण्याची संधी निश्चित मिळेल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.