माजी सरपंचाकडून उपवासकर्त्यांना इफ्तार पार्टी सर्वधर्म सहिष्णूता व बंधुभावाचा ठेवला आदर्श
प्रतिनिधी निंगनुर .मैनोदिन सौदागर ता उमरखेड जि यवतमाळ
निगंनूर येथील माजी सरपंच ब्रिजलाल मुडे यांनी पवित्र रमजान महिन्याचे उपवासाचे औचित्य साधून गावातील जामा मशिदमध्ये जाऊन रोजे करी मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देऊन समाजातील गरीब विधवा गरजूंना शाल व बंद पाकीट देऊन या जीवाची लाही लाही करणाऱ्या रणरणत्या उन्हाळ्यात रोजा रुपी अत्यंत कठीण अशा उपवासाच्या माध्यमातून गावात तसेच देशात सर्वजाती धर्मामध्ये बंधुभाव वाढीस लागावा व सर्वत्र शांतता नांदून सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी अल्लाह कडे प्रार्थना करावी असे आवाहन केले .
यावेळी जामा मजिदचे अध्यक्ष फिरोज अलि नवाब .मौलाना सैय्यद कलिम.मौलाना दाऊतशाहा .माजी उपसरपंच वलिउल्हाखाँन.समदखाँन.डॉ सुनील बरडे.मारोती मोतेवाड. लखन.अशरफ खाँनपोष्टमन.इमरानखाँन .नयुम अली नवाब.अनेक नागरिक या इफतार पार्टीला उपस्थित होते